शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

निविदांना अखेर सापडला मुहूर्त

By admin | Updated: May 19, 2016 02:07 IST

विविध प्रभागांतील रखडलेल्या विविध विकासकामांच्या सुधारित निविदा सूचना बोर्डाच्या प्रशासनाने बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केल्या

देहूरोड : बोर्डाच्या हद्दीतील देहूरोड बाजारपेठेसह विविध प्रभागांतील रखडलेल्या विविध विकासकामांच्या सुधारित निविदा सूचना बोर्डाच्या प्रशासनाने बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार रस्ते व गटारी दुरुस्ती व सुधारणा, सिमेंट रस्ते, जलवाहिन्या दुरुस्ती व देखभाल, शाळा इमारती, रुग्णालय व बोर्डाच्या विविध इमारती दुरुस्ती, तसेच पथदिवे व्यवस्था चालविणे, देखभाल कामांसाठी साडेचार कोटींहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षी १५ मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल यांनी गेल्या शुक्रवारी निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत उपोषण केले होते. उपोषणाला बोर्ड उपाध्यक्षांसह भाजपाचे सदस्य तसेच विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता.बोर्डाच्या स्थापत्य विभागाकडून देहूरोड बाजारपेठेतील विविध गटारी, तसेच वर्दळीच्या दुरवस्था झालेल्या विविध रस्त्यांसह अन्य काही प्रभागांतील रस्त्यांचे डांबरीकरण, रस्ते दुरुस्ती व सुधारणा, गटारी दुरुस्ती व सुधारणा, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे आदी कामांच्या सुमारे अडीच कोटींहून अधिक रकमेची तरतूद असलेल्या निविदा गत आर्थिक वर्षात प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, सदर इ निविदा सूचनांना त्या वेळी संबंधित ठेकेदारांनी अत्यल्प प्रतिसाद दिला होता. तर काही कामांच्या निविदाच भरल्या नव्हत्या. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बोर्डाच्या विशेष बैठकीत सुमारे अडीच कोटींच्या विकासकामांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला होता. प्रशासनाने पुन्हा कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या नव्हत्या.(वार्ताहर)>बुधवारी प्रशासनाने सुधारित निविदा सूचना प्रसिद्ध केल्या असून, यात बोर्डाच्या हद्दीतील रस्ते दुरुस्ती व सुधारणा कामांसाठी एक कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. गटारी दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.