शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांचा राजीनामा म्हणजे नौटंकी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 20, 2014 09:28 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २० - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेला राजीनामा म्हणजे नौटंकी असल्याची बोचरी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दारुण पराभव होऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खुर्ची सोडायला तयार नाहीत असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
लोकसभेचा निकाल लागल्यापासून बिहारमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसच्या गोटातूनच केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळताच नितीशकुमारांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. धर्मनिरपेक्षतेचा फालतू बाऊ केल्याने नितीशकुमारांना बिहारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. नितीशकुमार एनडीएत राहिले असते तर आज त्यांना लोकसभेत यशही मिळाले असते व त्यांचे दिल्लीतील राजकीय वजनही वाढले असते असेही त्यांनी स्पष्ट केले. 
नितीशकुमारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरही टीका केली आहे. महाराष्ट्र, आसाम अशा बहुसंख्य भागात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यायला हवा. पण काँग्रेस नेते खुर्ची सोडणार असा चिमटाही त्यांनी काढला आहे. 
आपसाठी नीतीमत्ता म्हणजे चणा - शेंगदाण्याचे दुकान
आम आदमी पक्षासाठी जनादेश म्हणजे पोरखेळ असून नीतीमत्ता म्हणजे त्यांना चणे-शेंगदाण्याचे दुकान वाटते. म्हणूनच आधी नैतिकतेच्या मुद्यावर दिल्लीची सत्ता सोडणारा आम आदमी पक्ष लोकसभेनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतो अशी टीका ठाकरेंनी केली आहे.