शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, आदींचे भवितव्य आज यंत्रबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 5:42 AM

पहिल्या टप्पा; प्रशासनाची जय्यत तयारी

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये उद्या, गुरुवारी मतदान होत असून, नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये आदींचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे.

नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर उर्फसागर डबरासे यांच्यासह ३० उमेदवार रिंगणात आहेत. रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमान, काँग्रेसचे किशोर गजभिये, बसपाचे सुभाष गजभिये, वंचित बहुजन आघाडीच्या किरण पाटणकर-रोडगे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात मुख्य लढत शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात आहे. तर वर्धात भाजपचे रामदास तडस आणि काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यात मुख्य लढत होत आहे. भंडारा-गोंदिया मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे सुनील मेंढे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांच्यात आहे. चंद्रपूरमध्ये १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य लढत भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांच्यात आहे. गडचिरोली- चिमूर मतदारसंघात ५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांच्यात आहे. नक्षल कारवायांच्या सावटात मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

या दस्तावेजापैकी कोणताही पुरावा वैधओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल, तर अशा वेळी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबुक, पॅन कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका,कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/ आमदार/ विधानपरिषद सदस्ययांना दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड याआधारे मतदारांनामतदान करता येईल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूर