शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणे यांची याचिका कामगारविरोधी

By admin | Updated: January 10, 2017 04:42 IST

कंबाटा अ‍ॅव्हिएशनची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या मालमत्ता जप्ती प्रक्रिया स्थगिती करण्याची मागणी करणारी काँग्रेस आमदार

मुंबई : कंबाटा अ‍ॅव्हिएशनची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या मालमत्ता जप्ती प्रक्रिया स्थगिती करण्याची मागणी करणारी काँग्रेस आमदार नितेश राणे यांची याचिका कामगारविरोधी असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. कंबाटा अ‍ॅव्हिएशनमधील देणी मिळावीत यामागणीसाठी बाबत आझाद मैदान येथे कामगारांनी निदर्शने केली. यावेळी अंजली दमानिया आणि शिवसेना उपनेत्या आणि आमदार नीलम गो-हे उपस्थित होत्या. कंबाटाच्या २४०० कामगारांचे आॅगस्ट २०१६ पासूनचे थकलेले वेतन आणि इतर देणी देण्यासाठी जवळपास ११० कोटींची आवश्यकता असून ही रक्कम उभी करण्यासाठी कंबाटा अ‍ॅव्हिएशन कंपनीची मुंबई विमानतळावर असलेली मालमत्ता गोठवण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार राज्य सरकारने कंपनीच्या मालकीच्या विमानतळावरील साधनसामग्रीमधील ३१६ वस्तु शनिवारी जप्त केल्या. या वस्तुंची किंमत चाळीस ते पन्नास कोटींच्या आसपास आहे. मात्र मालमतता जप्तीचा कामगार न्यायालयाचा आदेश हा फक्त १३० कामगारांपुरता मर्यादीत असून इतर कामगारांनाही त्यांच्या हक्काची देणी मिळणे गरजेचे असल्याची भुमिका घेत महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे नितेश राणे यांनी जप्तीच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल केली आहे. कामगारांना जानेवारी २०१६ पासून त्यांचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी आमचा लढा असल्याचा राणे यांचा दावा आहे. (प्रतिनिधी)इरॉस विकून कामगारांची देणी द्या : नीलम गोऱ्हेनितेश राणे यांच्या याचिकेला विरोध केलाच पाहिजे पण त्याचबरोबर कंबाटाच्या मालकीचे चर्चगेट स्टेशन बाहेर असलेले इरॉस थिएटर जप्त करून त्या पैशातून कामगारांची देणी द्यावीत, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.