शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

नितेश राणेंनी केले गुजरातींना लक्ष्य

By admin | Updated: November 7, 2014 04:58 IST

काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुंबईतील मराठीद्वेषी गुजरातींना लक्ष्य केले असून त्यांना महाराष्ट्रातून थेट हाकलून देण्याचे वक्तव्य केले आहे़

मुंबई : काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुंबईतील मराठीद्वेषी गुजरातींना लक्ष्य केले असून त्यांना महाराष्ट्रातून थेट हाकलून देण्याचे वक्तव्य केले आहे़टिष्ट्वटरवरून राणे यांनी हे वक्तव्य केले आहे़ ते म्हणाले, माझ्या वक्तव्याचा नेहमीच विपर्यास केला जातो़ पण गुजराती मराठी माणसाबाबत करत असलेल्या टीकेकडे कोणीच लक्ष देत नाही़ स्वच्छ भारत अभियानाद्वारे आता या महाराष्ट्रद्वेषी गुजरात्यांना येथून हद्दपार करा आणि याची सुरुवात मुंबईतून करायला हवी़ तसेच आम्ही गुजरातींना थेट सांगितले आहे की, तुम्ही जर आमच्याबद्दल बोलत राहाल तर आम्हालाही साफसफाईसाठी उतरावे लागेल आणि यामध्ये चुकीचे काही नाही. मुळात आपण त्या विशिष्ट गुजराती लोकांना विचारले पाहिजे की, आमच्या मराठी लोकांबाबत अशी भूमिका का मांडता. महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे. इथे आम्ही आमच्या पद्धतीने राहणार, असेही राणे यांनी सांगितले़ कशा पद्धतीने साफसफाई करणार याबाबत विचारले असता राणे म्हणाले, सर्व गोष्टी आधीच सांगता येणार नाहीत़ टप्प्याटप्प्याने ते जाहीर करीऩ आम्ही मांसाहारी आहोत म्हणून आम्हाला घरे नाकारली गेली तर आम्हाला सोसायटीतील घराघरात जाऊन सुके मासे टाकावे लागतील, असा धमकीवजा इशाराही राणे यांनी दिला.मराठी माणसासोबत अनेक गुजराती बांधव राहतात़ मात्र काही विशिष्ट गुजराती लोक आम्हाला अशा पद्धतीने हीन का लेखत आहेत, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला़ (प्रतिनिधी)