शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांच्या अंगावर फेकले मासे

By admin | Updated: July 6, 2017 15:06 IST

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर नितेश राणे फारच आक्रमक झाले आहेत

ऑनलाइन लोकमतसिंधुदुर्ग, दि. 6 - मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर नितेश राणे फारच आक्रमक झाले आहेत. मच्छीमारांच्या प्रश्नावर नितेश राणेंनी थेट सहाय्यक मत्स्य आयुक्तांनाच धारेवर धरलं आहे. यावेळी आक्रमक झालेल्या स्वाभिमान संघटनेचे नेते आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले आहेत. वैभववाडी-कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मालवण येथील जिल्हा कार्यालयात जाऊन सहाय्यक मत्स्य आयुक्तांची भेट घेतली होती. अचानक आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी थेट आयुक्तांच्या टेबलावर माशांची टोपली रिकामी केली. चर्चादरम्यानही नितेश राणेंनी आक्रमक पवित्र घेतल्यानं सगळेच अवाक् झाले. संताप अनावर झाल्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी थेट मत्स्य आयुक्तांना मासे फेकून मारले. तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, तुम्ही पैसे खात असल्यामुळेच आम्हाला इथवर यावं लागलं. मच्छीमा-यांच्या प्रश्नावरून नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांना खडे बोलही सुनावले आहेत.

आणखी वाचा(शिवसेनेचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा- नितेश राणे)(नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आवाज उठविणार -नितेश राणे)(तेजस एक्सप्रेसला कणकवलीत थांबा द्या: नितेश राणे)

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांदा परिसरातील माकडतापग्रस्त भागाला भेट दिली होती. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रशासनावर टीका केली होती.  माकडतापाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेसह सत्ताधाऱ्यांचा त्यांनी यावेळी समाचार घेतला होता.  माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे कोणतेही पूर्व नियोजन नाही.  वचक नसल्यानेच प्रशासनाने  माकडतापाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.  माकडतापाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात पसरल्यास आवश्यक लसीचा पुरवठा प्रशासनाकडे नाही, असे आरोप यावेळी राणे यांनी प्रशासनावर केले होते. सिंधुदुर्गात मंत्री आणि आमदार येतात व जातात .  भेट द्यायला हे काय पर्यटनस्थळ आहे ?, असा संतप्त  सवालही त्यांनी उपस्थित केला होता.  माकडतापाने मेलेली 50 ते 60 माकडं शेजारच्या एका राज्याने जिल्ह्यात पुरल्याने माकडतापाचा प्रादुर्भाव वाढला. पण ही माहिती प्रशासन का  लपवून ठेवतयं ?, असा हल्लाबोलही त्यांनी केला होता. 
फक्त आढावा बैठका घेऊन आणि कॅमेऱ्यासमोर प्रशासनाला दम भरून माकडताप आटोक्यात येणार नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांना लगावला होता.