शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एनआयटी वाचली; अधिकारही कायम!

By admin | Updated: December 9, 2014 00:57 IST

नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा वा प्रन्यासच्या अधिकारांमध्ये कपात करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तूर्त विचार नसल्याचे समजते. प्रन्यास बरखास्तीच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी सही

मुख्यमंत्र्यांचा बरखास्तीचा विचार नाही : महापालिकेला तूर्त जादा अधिकार नाहीचनागपूर : नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा वा प्रन्यासच्या अधिकारांमध्ये कपात करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तूर्त विचार नसल्याचे समजते. प्रन्यास बरखास्तीच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची चर्चा आज दिवसभर होती. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचा इन्कार केला. भूखंड नियमितीकरण, विकास शुल्क आकारून (रस्ते, पथदिवे, मलनि:स्सारण आदी) ते विकसित करणे, बांधकाम नकाशांना मंजुरी, मालमत्तेच्या खरेदीविक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे, सार्वजनिक उपयोगाच्या जागा विकसित करणे आदी कामे महापालिकेच्या हद्दीत सुधार प्रन्यासतर्फे केली जातात. ही कामे महापालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हे करताना एमएमआरडीएच्या धर्तीवर एनएमआरडीए स्थापन करायचे व प्रन्यासकडे मेट्रो रिजनअंतर्गतचा विकास करण्याची जबाबदारी द्यायची, असेही प्रस्तावित होते. त्यामुळे महापालिकेचे अधिकार वाढणार होते आणि प्रन्यासच्या अधिकारांवर गदा येणार होती. सूत्रांनी सांगितले की, महापालिकेला अधिकारांचे एवढे ओझे पेलवेल की नाही आणि प्रन्यास अस्तित्वात असताना ती बरखास्त करण्याची भूमिका योग्य होणार नाही. पर्यायी परिणामकारक व्यवस्था तयार होईपर्यंत तरी प्रन्यास बरखास्त करू नये आणि प्रन्यासच्या अधिकारांना कात्रीही लावू नये, असा नवा विचार आता समोर आला आहे. हे करताना शहरालगतच्या परिसराचा विकास करण्यासाठी एनएमआरडीएच्या स्थापनेचा विचार सरकारने सोडलेला नाही. गडकरी आणि फडणवीस या दोन नागपूरकर नेत्यांच्या कार्यकाळात नागपुरात विकासाच्या अनेक गतिविधी होणार असताना शहर व परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी प्रन्यास आणि महापालिकेने समन्वयाने काम केले तसेच पुढे एनएमआरडीएच्या माध्यमातून विकास झाला तर त्याचा फायदाच होईल, असा मतप्रवाहही पुढे आला आहे. (विशेष प्रतिनिधी)