शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निरुपा रॉय यांच्या मुलाला बेडरुम मिळेना, न्यायालयात धाव

By admin | Updated: March 3, 2017 11:08 IST

बॉलिवूड चित्रपटांमधील आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या निरुपा रॉय यांच्या मुलांचं संपत्तीवरुन भांडण सुरु असून हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - बॉलिवूड चित्रपटांमधील आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या निरुपा रॉय यांच्या मुलांचं संपत्तीवरुन भांडण सुरु असून हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे भांडण सुरु आहे. निरुपा रॉय यांची मुलं योगेश रॉय आणि किरण रॉय यांच्यात हे भांडण सुरु असून हे प्रकरण मिटवण्यासाठी दोघेही न्यायालयाच्या पायरीवर चढले आहेत. निरुपा रॉय यांचे पती कमल रॉय यांच्या निधनानंतर नेपिअन्सी रोडवर असलेल्या या घरासाठी मुलांमध्ये भांडणं सुरु झाली होती. 
 
निरुपा रॉय यांचा छोटा मुलगा किरण याने मोठा भाऊ योगेश संपुर्ण संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला धमकावत असल्याचा आरोप केला आहे. मुख्य म्हणजे हे भांडण संपुर्ण संपत्तीसाठी नसून निरुपा रॉय यांच्या खासगी बेडरुमवरुन सुरु आहे. किरण आणि योगश दोघे आणि त्यांचं कुटुंब अॅम्बेसी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील चार बेडरुम फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहे. निरुपा रॉय यांनी 1963 मध्ये 10 लाखाहूनही कमी किंमतीत हे घर विकत घेतलं होतं. 
 
आपला मोठा भाऊ योगेश सर्व संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं किरणचं म्हणणं आहे. 'योगेश कधीच आई - वडिलांसोबत व्यवस्थित वागला नाही, त्यामुळे त्याला संपत्तीचा भागीदार नाही बनवलं', असंही किरणने सांगितलं आहे.
 
'आईच्या निधनानंतर मी वडिलांची काळजी घेतली. त्यांच्या बेडरुममध्ये मी राहावं अशी त्यांची इच्छा होती. याबद्दल त्यांनी माझा भाऊ आणि त्याच्या कुटुंबाला स्पष्ट सांगितलं होतं. पण आता योगेशला संपत्तीचा वाटा पाहिजे', असं किरणने सांगितलं आहे.