शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्या

By admin | Updated: April 16, 2016 02:51 IST

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचा शेरा देऊन पुनर्परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक

मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचा शेरा देऊन पुनर्परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांकडे केली आहे. इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेवर नापास ऐवजी कौशल्य विकसित असा शेरा करण्याची घोषणा तावडे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. दहावी व बारावीचा निकाल जास्त लागावा म्हणून काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांत अभ्यासात कमकुवत असलेल्या नववी व अकरावी मधील विद्यार्थ्यांना नापास केले जाते. त्यामुळे नापास झालेली मुले दहावी आणि बारावीसाठी बाहेरून अर्ज करतात. मात्र त्यांतील बहुतांश विद्यार्थी पुन्हा नापास झाल्यावर शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात. जर पहिली ते आठवी व दहावीतील विद्यार्थी यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा शेरा हद्दपार झाला आहे, तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही ताबडतोब पुनर्परीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी सरकारने आदेश देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)असे करता येईल नियोजन१ मेपर्यंत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षित असतो. त्यामुळे परीक्षांना नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यानंतर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात नापास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येईल, ज्याचा निकाल परीक्षा झाल्याच्या आठ दिवसांत लावला जाईल. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुढील इयत्तेसाठी प्रवेश देता येईल. जेणेकरून विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही.