अकोट, दि. २८- खेळता खेळता चुकून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे २८ जानेवारी रोजी घडली. केळीवेळी येथे काही मुले खेळत होते. खेळता खेळता या मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या, त्यामुळे या मुलांना मळमळ व अस्वस्थ वाटू लागले. यामध्ये श्वेता प्रमोद विखे (१३), मृत्युंजय सुनील वरणकार (८), श्रुती गजानन टोहरे (८), अथर्व सुरेश टवरे (१३), वैष्णवी सुनील वरणकर (७), अथर्व वरणकार (८), राधिका सुरेश टोहरे (९), ऋषिदा विजयसिंग ठाकूर (५) यांचा समावेश आहे. ही घटना लक्षात येताच या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने गांधीग्राम येथील रुग्णवाहिकेने अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. या मुलांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी डॉ जावेद खान आणि पायलट संतोष ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Updated: January 29, 2017 02:21 IST