शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

आई महोत्सवात नऊ मातांचा गौरव

By admin | Updated: June 29, 2016 03:04 IST

‘रोटरी क्लब आॅफ डोंबिवली डाउन टाउन’ व ‘पॉल पेरापिल्ली परिवारा’तर्फे रिटा पॉल यांच्या स्मरणार्थ नुकताच आई महोत्सव घेण्यात आला.

डोंबिवली : ‘रोटरी क्लब आॅफ डोंबिवली डाउन टाउन’ व ‘पॉल पेरापिल्ली परिवारा’तर्फे रिटा पॉल यांच्या स्मरणार्थ नुकताच आई महोत्सव घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रतिकू ल परिस्थितीत मुलांना वाढवलेल्या नऊ मातांचा सत्कार करण्यात आला.डॉ. अरुण पाटील यांची संकल्पनेतून हा महोत्सव सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झाला. त्यात सीमा कुलकर्णी, औरंगाबादमधील निर्मला जोशी, अनिता नलावडे, नीता देवळालकर, काशीबाई वायले, नंदा ढोनुष्के, पुष्पा गवळी, नलिनी वानखेडे, व अहमदनगरच्या मंदाकिनी काळोखे या नऊ आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला. माजी पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते, पॉल पेरापिल्ली, निखित धूत यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्हाबरोबर साडी, डॉ. पाटील यांचे ‘वाचाल तर वाचाल’ हे पुस्तक, ज्योती साठवणे यांच्यातर्फे ‘गोलघुमट’ पुस्तक, पापरी भौमिकतर्फे भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या.आईच्या त्यागाबद्दल नवीन पिढी असंवदेनशील होत आहे. असे असतानाच आईचे कर्तृत्व समाजापुढे आणण्याचे सकारात्मक कार्य हा क्लब करत आहे, असे मत मोहिते यांनी व्यक्त केले. माधुरी वानखेडे यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘हास्यदरबार’ या कार्यक्रमातून जगभरातील रसिकांनी हसवणारे दिलीप खन्ना यांनी कार्यक्रमात रंगत आणली. डॉमनिक जॉन, योगेश झांबरे, प्रमोद रेमणे,अशोक पगारे यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पाटील यांनी केले. राहुल बोस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>पाच हजारांची मदत : आदिवासी मुलांसाठी कार्य करणाऱ्या संजीवनी आदिवासी गु्रपसाठी निर्मला जोशी यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला. तो त्यांनी डॉ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.