शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विषारी वायुगळतीने नऊ विद्यार्थिनी बेशुद्ध

By admin | Updated: December 12, 2014 00:32 IST

मोहाडी तालुक्यातील करडी (पालोरा) येथील एलोरा पेपर मिल बघण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नऊ विद्यार्थिनी क्लोरिन वायु गळतीने बेशुद्ध पडल्या आहेत. ही घटना आज गुरूवारला दुपारच्या

तुमसरात उपचार : एलोरा पेपर मिल येथील घटनातुमसर : मोहाडी तालुक्यातील करडी (पालोरा) येथील एलोरा पेपर मिल बघण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नऊ विद्यार्थिनी क्लोरिन वायु गळतीने बेशुद्ध पडल्या आहेत. ही घटना आज गुरूवारला दुपारच्या सुमारास घडली. त्यांच्यावर तुमसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोहाडी तालुक्यातील करडी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर देव्हाडी येथे सुरू आहे. शिबिरादरम्यान विद्यार्थीनींना करडी येथील ऐलोरा पेपर मिल येथे भेट व कागदनिर्मितीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी प्राध्यापकांनी मिल प्रशासनाच्या परवानगीने आज दुपारी नेले होते. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थीनी कागद निर्मिती प्रक्रियेची माहिती जाणून घेत होत्या.विद्यार्थीनी कारखान्यात असल्याने तेथील सर्व मशिन बंद करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक त्या सुरू झाल्यामुळे क्लोरिन वायुची गळती सुरू झाली. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जीव गुदमरू लागला अशात त्यांच्या नाक व डोळ्यातून अश्रू वाहून त्यांना चक्कर येवून नऊ विद्यार्थीनी जमिनीवर कोसळल्या. यात रोहिनी मेश्राम, उषा हलमारे, निशिगंधा धोटे, ज्योति भोयर, शिला गोबाडे, आशा गिजेवार, शिला माटे, पुष्पा राईगीलवार व मोनिका श्यामकुंवर यांचा समावेश आहे. या तरुणी १८ ते २१ वयोगटातील आहेत.वायू गळती मोठ्या प्रमाणात झाल्याने विद्यार्थीनीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे त्या सैरावैरा पळू लागल्या. बेशुद्ध झालेल्या विद्यार्थीनींना पेपर मिल प्रशासनाने रुग्णवाहिके द्वारे तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून वृत्त लिहिपर्यंत नऊही विद्यार्थीनी बेशुद्ध अवस्थेत होत्या. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी विद्यार्थीनींचे बयाण नोंदविले आहे. यातील काही विद्यार्थीनींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना भंडारा किंवा नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)