शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नऊ अट्टल दरोडेखोरांना गडचिरोलीत अटक

By admin | Updated: July 16, 2016 23:03 IST

गडचिरोली व अन्य ठिकाणी दरोडा घालण्यासाठी आलेल्या नऊ अट्टल सशस्त्र दरोडेखोरांना झायलो गाडीसह गडचिरोली पोलिसांनी गुरुवारी(ता.१४)रात्री अटक केली.

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. १६ - गडचिरोली व अन्य ठिकाणी दरोडा घालण्यासाठी आलेल्या नऊ अट्टल सशस्त्र दरोडेखोरांना झायलो गाडीसह गडचिरोली पोलिसांनी गुरुवारी(ता.१४)रात्री अटक केली.पंकज रवी साखरे(२६) रा. साखरा ता.गडचिरोली, दिनेश सुभाष गायकवाड(३८) रा.गडचिरोली, मोहम्मद इम्रान ताज खाँ (२४), फिरोज खाँ(२६), सुशील मधुकर चव्हाण(२५), राज रामानंद आर्या(२९), अजहर शेख रफिक शेख(२४), झिशान खाँ मुरस्तदी खाँ(२५), समीर शाहिद खाँ(२६) व अरमान सिद्दीकी(सर्व रा.नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.गुरुवारी रात्री नऊ जण धानोरा मार्गावरील हॉटेल वैभवमधील कॅफेमध्ये बसले होते. हे दरोडेखोर असल्याची कल्पना येताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांना कुणीतरी मोबाईलवरुन माहिती दिली. लागलीच डॉ.कवडे यांनी पोलिस ताफ्यासह हॉटेल वैभव गाठले. तेथे संशयास्पद स्थितीत असलेल्या नऊ जणांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तोल, एक एअर पिस्तोल, एम.एच ३१ डी.सी. ७८३८ क्रमांकाची महिंद्रा झायलो गाडी, दोन लोखंडी धारदार कत्ते, एक गुप्ती, एक कुऱ्हाड, एक रॉड व तब्बल १४ मोबाईल ताब्यात घेतले. उपरोक्त १० आरोपींपैकी ९ जणांना अटक करण्यात आली असून, अरमान सिद्दीकी हा फरार आहे. अटकेतील आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सतर्कतेने दरोडेखोरांचे मनसुबे अयशस्वी केल्याने पोलिसांचे अभिनंदन होत आहे