शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त निंबाळकर यांची जातीवाचक टिप्पणी?

By admin | Updated: July 7, 2017 04:13 IST

महापालिकेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नेत्यांना दिलेली दालने सील केल्याने याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नेत्यांना दिलेली दालने सील केल्याने याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले रिपाइंचे गटनेते व शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आणि महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यात गुरुवारी कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात निंबाळकर यांनी हीन दर्जाची जातीवाचक टिप्पणी केल्याने त्यांचा सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. आपली चूक झाल्याचे लक्षात आल्यावर निंबाळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी जातीवाचक वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. उल्हासनगर महापालिकेत प्रथेनुसार प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याला कार्यालय दिले जाते. रिपाइं (आठवले गट), भारिप, पीआरपी यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांना दालने व सोयीसुविधा पालिकेने पुरवल्या होत्या. मात्र अचानक या पाचही पक्षांची दालने सोमवारी सील करण्यात आली. याप्रकाराने पाचही पक्षांचे नगरसेवक संतप्त झाले. कायद्यानुसार एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के नगरसेवक निवडून आलेल्या पक्षाच्या गटनेत्यांना दालने उपलब्ध करुन देणे महापालिकेवर बंधनकारक आहे. या पाच पक्षांनी अवैधपणे दालने बळकावल्याने ही कारवाई केल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. गटनेत्यांना दालने देण्यापूर्वी हा नियम आयुक्तांच्या ध्यानात आला नाही का, असा सवाल पीआरपीचे प्रमोद टाले यांनी आयुक्तांना केला.आयुक्त दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी पालिकेत उपस्थित असल्याने दुपारी रिपाइंचे भगवान भालेराव त्यांच्याकडे गेले व त्यांनी निंबाळकर यांना दालन सील करण्याबाबत जाब विचारला. शब्दाला शब्द वाढत गेला आणि दोघांत तू तू मै मै झाले. रागाच्या भरात आयुक्तांनी जातीवाचक टिप्पणी केली. यावेळी उपायुक्त संतोष दहेरकर, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक प्रकाश तरे हेही उपस्थित होते. याचवेळी शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी तेथे आले. आपण जातीवाचक टिप्पणी करुन मोठी चूक केल्याचे आयुक्तांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वांसमक्ष दिलगिरी व्यक्त केली. भालेराव यांनी आयुक्तांचे जातीवाचक उदगार बाहेर येऊन जाहीर करताच सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.रिपाइंचे भालेराव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आयुक्तांच्या दिलगिरीने आंबेडकरी जनतेचे समाधान झाले नाही.रिपाइंचा निर्णय आजआयुक्तांनी जातीवाचक टिप्पणी केल्याबाबत भालेराव यांनी पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनेवरुन नेते व कार्यकर्त्यांची बैठक उद्या (शुक्रवारी) आयोजित केल्याची माहिती भालेराव यांनी दिली. आयुक्तां विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.