शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा

By admin | Updated: April 27, 2016 06:41 IST

बेदम मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी पहाटे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाचजणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे / चिपळूण : रत्नागिरीतील मराठा आरक्षण मेळाव्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी पहाटे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाचजणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सावंत यांच्यावर ठाणे सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू असून हे प्रकरण तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत काँग्रेसच्यावतीने मराठा आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला तालुका अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक संदीप सावंत जाऊ शकले नव्हते. याच गोष्टीचा राग मनात धरून २४ एप्रिल रोजी रात्री माजी खासदार निलेश राणे आणि तुषार, मनीष, अण्णा आणि कुलदीप खानविलकर हे कार्यक्रम संपल्यानंतर सावंत यांच्या घरी आले. त्यांना खाली बोलवून जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले. २५ एप्रिलला त्यांना मुंबई, जोगेश्वरी येथे सोडून देण्यात आले. त्यानंतर सावंत यांनी त्यांचे मावस भाऊ विनायक सुर्वे यांना फोन करून बोलवून घेतले. त्यांनी त्याला सोमवारी रात्री ठाण्यात आणून सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सावंत यांच्या डोक्याला जबर मार लागला असून अंग काळेनिळे झाले आहे, असे सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. आपल्याला हॉकी स्टीक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची तक्रार जखमी सावंत यांनी ठाणे शहर पोलिसांकडे केली असून अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.आई आजारी असल्याने संदीप हे कार्यक्रमास गेले नाहीत, असे त्यांच्या पत्नी शिवानी यांनी सांगितले. त्याच रात्री निलेश राणे घरी आले आणि त्यांना नेहमीप्रमाणे घेऊन गेले. म्हणून त्या गोष्टीकडे सावंत कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. पंरतु सकाळ झाली तरी संदीप घरी न आल्याने आम्ही काळजीत होतो. त्यांचा मोबाईल घरीच राहिल्याने आमदार नितेश राणे यांना सोमवारी सकाळी ६ वाजता फोन केला. त्यानंतर नारायण राणे यांच्या पत्नी निलमताईंना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावर निलमताईंनी तुझा नवरा सुखरूप घरी येईल, त्याला काही होणार नाही, असे आश्वासन दिल्याचे शिवानी म्हणाल्या. हा प्रकार गैरसमजूतीतून झाला असल्याचेही त्या म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मंगळवारी पहाटे अपहरण आणि मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा चिपळूण पोलिसांकडे वर्ग केला. याबाबतची कागदपत्रे तातडीने रवाना करण्यात आली.- एम.व्ही.धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर >संदीप सावंत याने आपल्याकडे घर बांधण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. ते त्याला मिळाले नाहीत म्हणून विरोधकांच्या साथीने हा घाणेरडा डाव रचण्यात आला आहे. -निलेश राणे, माजी खासदार