शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर अवतरला निळा जनसागर

By admin | Updated: October 15, 2014 01:40 IST

१४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर

जयभीमच्या घोषणांनी निनादला परिसर नागपूर : १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर दीक्षाभूमीवर अवतरला होता. यावेळी जयभीमच्या घोषणांनी परिसर निनादला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीच्या दिवशी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दिवशी दसरा होता. त्यामुळे दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षेचा सोहळा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आयोजित केला जातो. त्या दिवशी देश-विदेशातून बौद्ध, आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. नागपुरातील उपासक-उपासिका त्यांच्या सेवेत असतात. त्यामुळे नागपूर व आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका १४ आॅक्टोबर रोजी धम्मदीक्षेचा सोहळा साजरा करीत असतात. गेल्या ५७ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. आज बुधवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिकांनी गर्दी केली. मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. हातात पंचशीलेचे ध्वज घेऊन जयभीमच्या घोषणांनी तरुणाईने परिसर निनादला होता.गोव्याच्या परेश परवार यांनी घेतली बुद्ध धम्माची दीक्षा गोवा येथील परेश ऊर्फ पांडुरंग परवार या तरुणाने आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. भंते सुगत बोधी यांनी परेश यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. परेश हे गोवा येथील पेडणे तालुक्यातील इब्रामपूर या गावचे रहिवासी आहेत. ते राज्य शासनाच्या नियोजन विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. ते मागासवर्गीय समाजाचे असून त्यांच्या कुटुंबामध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेणारे ते पहिले आहेत. वयाच्या १४ व्या वर्षांपासून त्यांना बाबासाहेब समजू लागले. तेव्हापासून ते आंबेडकरी चळवळीत कार्य करीत आहे. कुटुंबातील कुणीही बौद्ध नसल्याची खंत त्याच्या मनाला नेहमी बोचत असे. कुटुंबात पत्नी व दोन मुलं आहेत. नागपुरातील बीएसएनएलचे डिव्हिजनल इंजिनियर बाबा लखोटे हे काही काळ गोव्यात नोकरीला होते. त्यावेळी त्यांच्याशी परवार यांचा संपर्क झाला. त्यांच्या प्रेरणेतून यावर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे त्यांनी निश्चित केले. १४ तारखेला कुटुंबासह दीक्षा घेण्याची त्यांची योजना होती. परंतु मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आणता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी एकट्यानेच दीक्षा घेतली. (प्रतिनिधी)