शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एमडी तस्करीच्या वादातून नायजेरियनची हत्या

By admin | Updated: September 22, 2016 02:46 IST

एमडी तस्करीच्या वादातून त्रिकूटाने नायजेरियन नागरिकाची हत्या झाल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकूटाच्या चौकशीत उघड झाले.

मुंबई : एमडी तस्करीच्या वादातून त्रिकूटाने नायजेरियन नागरिकाची हत्या झाल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकूटाच्या चौकशीत उघड झाले. आलम अली शेख, युसुफ अली शेख, अफझल अली शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. डोंगरी पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत.नायजेरियन नागरिक सॅमसन चीविस्टीयन चिडकवे (२७) १७ सप्टेंबर रोजी आलमला एमडी विकण्यास आला होता. ते दोघे सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन यार्ड येथे भेटले. दरम्यान, एमडीची टेस्ट केल्यानंतर आलमने एमडी घेण्यास नकार दिला. यातूनच दोघांमध्ये वाद झाले. अशात आलमने युसुफ आणि अफझललाही बोलावून घेतले. त्यांनी धारदार शस्त्रांनी सॅमसनवर हल्ला चढवला. यात सॅमसन गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्राने अटकेच्या भीतीने सॅमसनला वाशी येथील शासकीय रुणालयात दाखल केले. त्या वेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वाशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत हा गुन्हा पुढील तपासासाठी डोंगरी पोलिसांकडे वर्ग केला. डोंगरी पोलिसांनी बुधवारी या तिघांनाही अटक केली. यापैकी आलम हा अभिलेखावरील आरोपी आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)