शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

‘एनआयए’चे दात ‘एनआयए’च्याच घशात

By admin | Updated: June 29, 2016 23:14 IST

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला २०१५ मध्येच जामिनावेळी साक्षिदारांनी साक्ष फिरवली होती. तेव्हा विरोध करणारी एनआयए आता त्याच आधारावर साध्वीला जामीन देण्यासाठी कशी अनुकूल होते?

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ : साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला २०१५ मध्येच जामिनावेळी साक्षिदारांनी साक्ष फिरवली होती. तेव्हा विरोध करणारी एनआयए आता त्याच आधारावर साध्वीला जामीन देण्यासाठी कशी अनुकूल होते? असे ताशेरे ओढत विशेष न्यायालयाने ‘एनआयए’चे दात ‘एनआयए’च्याच घशात घातले आहेत. एनआयएने क्लीनचीट दिल्याने व तब्येतीच्या कारणास्तव साध्वीने मे महिन्यात जामिनसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मंगळवारी विशेष न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून एनआयएला जोरदार झटका दिला. साध्वीच्या जामीन अर्जाच्या निकालाची ४० पानी प्रत बुधवारी प्रसारमाध्यामांना उपलब्ध झाली. साध्वीची जामिनावर सुटका न करण्याची अनेक कारणे न्यायालयाने दिली आहेत. एनआयएची दुटप्पी वृत्तीही यामुळे चव्हाट्यावर आली आहे. ............................................एनआयएचे दावे-साध्वीविरुद्ध साक्ष देणाऱ्या महत्त्वाच्या साक्षीदारांनी दिल्ली दंडाधिकाऱ्यांपुढे साक्ष फिरवली -या बॉम्बस्फोटाच्या केसमधील आरोपी नंबर ७, १० आणि १२ यांनी त्यांच्या कबुली जबाबात या बॉम्बस्फोटाच्या कटात साध्वीही सहभागी असल्याचे म्हटले आहे. मात्र या केसमधील आरोपींची मोक्कातून सुटका केल्याने त्यांच्या कबुलीजबाबाचा वापर साध्वीविरुद्ध केला जाऊ शकत नाही.-बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता, ती मोटारसायकल साध्वीने दोन वर्षांपूर्वीच रामचंद्र कलासंग्रा याला विकली होती...........................................साध्वीचा दावा-एनआयएने आरोपपत्र दाखल केल्यानंतर परिस्थितीत बदल झाला.-मोटारसायकल विकल्याने आपला बॉम्बस्फोटाशी संबंध नाही-ब्रेस्ट कॅन्सरने आजारी आहे. आरोपीलाही त्याच्या पसंतीनुसार हवे त्या रुग्णालयात उपचाराचा अधिकार आहे............................................. न्यायालयाचे निरीक्षण-एनआयएने दिलेल्या क्लीनचीट बाबत बोलताना विशेष न्या. श्रीपाद टेकाळे यांनी एनआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. साध्वीने २०१५ मध्ये जामीन अर्ज केला होता. अर्ज दाखल केला, तेव्हा तीन महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एका साक्षीदाराने एनआयएच्या अधिकाऱ्यापुढे साक्ष फिरवली होती. त्यानंतर साध्वीच्या जामीन अर्जावर एनआयएने उत्तर दिले. त्यावेळी दुसऱ्या साक्षीदारानेही साक्ष फिरवली होती. तर जामीन अर्जावर निकाल देण्यापूर्वी तिसऱ्या साक्षीदारानेही साक्ष फिरवली. अशावेळीही एनआयएने या तिघांच्याही साक्षीचा आधार न घेता उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून साध्वीच्या जामिनाला कडाडून विरोध केला होता. मग आता विरोध का करण्यात आला नाही? हे केवळ एनआयच्या वकिलांनाच माहित. साध्वीने एनआयएच्या क्लीनचीटच्या आधारावर जामीन अर्ज केला आहे. या कारणामुळे आम्हाला अर्जदाराची विनंती मान्य करणे कठीण आहे.-आरोपींचे कबुली जबाब वगळण्याबाबत न्यायालयाने म्हटले की, जरी आरोपींचे कबुलीजबाब वगळण्यात आले तरी अर्जदाराविरुद्ध केस होत आहे.-एनआयएच्या तपास अधिकाऱ्याने केलेल्या विश्लेषणानुसार प्रथमदर्शनी असे दिसून येते, की संबंधित अधिकाऱ्याने पुढील तपासाच्या नावाखाली काहीही तपास न करता, एटीएस अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या साक्षीच्या आधारे निष्कर्ष काढला. मात्र काढलेला निष्कर्ष या न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांविरुद्ध आहे. निश्चितच ही ‘बदललेली परिस्थिती’ नाही. -साध्वीविरुद्ध थेट पुरावे नसल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. परंतु, न्यायालयाने एनआयएचा हा दावा देखील फेटाळला. ‘कट रचल्याबाबत थेट पुरावे नसले तरी अप्रत्यक्ष पुरावे ग्राह्य धरले जाऊ शकतात. प्रत्येक कट सिद्ध करण्यासाठी थेट पुरावे उपलब्ध असतीलच, असे नाही म्हणूनच कायद्यात अप्रत्यक्ष पुरावे ग्राह्य धरण्याची तरतूद आहे,’ असे निरीक्षणही न्या. टेकाळे यांनी नोंदवले.-साध्वीने आणि एनआयएने मोटारसायकलवरून केलेला युक्तिवादही न्यायालयाने फेटाळला. ‘अर्जदाराच्या नावावर मोटारसायकल होती आणि तीच त्या मोटारसायकलची मालक होती. त्यामुळे तिच्याविरुद्ध केस होऊ शकते,’ असेही न्यायालयाने म्हटले. तसेच तिने तब्येतीची पुढे केलेली सबबही जामिनासाठी ग्राह्य धरण्यास न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयाने साध्वीवर सरकारी न्यायालयात उपचार करण्याचा आदेश दिला आहे.