शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएची न्यायालयात धाव

By admin | Updated: April 14, 2017 02:04 IST

विशेष न्यायालयाने इसिसकडून प्रशिक्षण घेतल्याचा आरोप असलेल्या अरीब माजिदवरून युएपीए (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा) हटवल्याने राष्ट्रीय तपास पथकाने

मुंबई: विशेष न्यायालयाने इसिसकडून प्रशिक्षण घेतल्याचा आरोप असलेल्या अरीब माजिदवरून युएपीए (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा) हटवल्याने राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एनआयएच्या अपिलावरील सुनावणी ६ जून रोजी ठेवली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने विशेष एनआयए न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर स्थगिती देण्यास नकार दिला. माजिदने जेव्हा ईसीसकडून प्रशिक्षण घेतले, तेव्हा भारतीय कायद्यानुसार ईसीसला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करण्यात आले नव्हते, असे म्हणत विशेष न्यायालयाने माजिदवरी युएपीएअंतर्गत नोंदवण्यात आलेले गुन्हे रद्द केले.एनआयएच्या म्हणण्यानुसार, कल्याण-डोंबिवलीमध्ये राहणारा माजिद आणि आणखी तीन युवक तीर्थयात्रेला जाण्याचा बहाण करून इसिसकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गेले. नोव्हेंबर २०१४ मध्ये माजिद भारतात परत येत असताना त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर युएपीएचे कलम १६ (दहशतवादी कृत्य केल्याबद्दल शिक्षा), कलम १८ (कट रचल्याबद्दल शिक्षा) व भारतीय दंडसंहिता कलम १२५ (देशाविरुद्ध युद्ध पुकारणे) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. विशेष न्यायालयाने माजिदची युएपीए कलम २० मधून सुटका केल्याने एनआयने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एनआयएनच्या म्हणण्यानुसार, युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिलने २०१४ मध्ये ईसीसीवर बंदी घालतली आहे. युएन सदस्यांमध्ये भारताचाही समावेश असल्याने ही बंदी भारतासाठीही लागू होते. त्यामुळे माजिदवर युएपीएच्या कलम २० अंतर्गत नोंदवलेला गुन्हा रद्द करणे चुकीचे आहे. (प्रतिनिधी)