शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

साध्वी प्रज्ञा ठाकूरच्या जामीन अर्जाबाबत एनआयए अनुकूल

By admin | Updated: January 20, 2017 05:10 IST

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरची जामिनावर सुटका करण्यास राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) सकारात्मकता दाखवली आहे.

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरची जामिनावर सुटका करण्यास राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) सकारात्मकता दाखवली आहे. साध्वीच्या जामीन अर्जावर आपली काहीच हरकत नसल्याचे एनआयएने उच्च न्यायालयापुढे स्पष्ट केले. तर दुसरीकडे एटीएसने सरळ माघार घेत या प्रकरणात म्हणणे मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे उच्च न्यायालयाला सांगितले.ठाकूरच्या विरोधात पुरावे नसल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. त्याशिवाय ठाकूर व सहआरोपींवर एटीएसने मकोका अंतर्गत ठेवलेले आरोप एनआयएने वगळले आहेत. या आरोपींवरून मकोका हटवण्यात यावा, अशी शिफारस खुद्द सर्वोच्च न्यायालयाने केली होती. याच शिफारशीवरून एनआयएने या सर्व आरोपींवर ठेवण्यात आलेला मकोका हटवला. त्यामुळे मकोका अंतर्गत जामीन न देण्याची तरतूद तिला लागू होत नाही, असा युक्तिवाद एनआयएतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे केला.‘या बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यापूर्वी एटीएसने ज्या साक्षीदारांचा जबाब नोंदवला त्याच साक्षीदारांनी एनआयएपुढे वेगळा जबाब दिला. दोन्ही तपास यंत्रणांपुढे दिलेल्या जबाबांत विसंगती आहे. उलट साक्षीदारांनीच त्यांना जबाब देण्यासाठी छळण्यात आल्याची तक्रार केली. या आधारावर ठाकूर जामिनावर सुटका करण्याची मागणी करू शकते,’ असेही सिंग यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने एटीएसला त्यांची साध्वीच्या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. मात्र एटीएसने या अर्जावर भूमिका स्पष्ट करण्याचा अधिकार नसल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘एटीएसला या अर्जावर भूमिका मांडण्याचा अधिकार नाही आणि जे सांगायचे होते, ते अर्जदाराने (ठाकूर) सांगितले,’ असे एटीएसच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. मकोका हटवण्यात आला तरी विशेष एनआयए न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्याने साध्वीने उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. ‘अर्जदारावरील (साध्वी) मकोका हटवण्यात आला आहे. तपास यंत्रणांकडे तिच्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत. केवळ संशयाच्या आधारावर एखाद्या आरोपीला इतकी वर्षे तुरुंगात ठेवले जाऊ शकत नाही. खटला सुरू होण्यास बराच काळ लागेल. अद्याप आरोपनिश्चिती झालेली नाही. एका महिलेला इतका काळ तुरुंगात ठेवणे योग्य नाही. तिची तब्येत खालावल्याने तिला तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे,’ असा युक्तिवाद साध्वीतर्फे ज्येष्ठ वकील अविनाश गुप्ता यांनी केला. (प्रतिनिधी) >कागदपत्रे देण्याचे आदेश : खंडपीठाने एनआयएला तीन आरोपींचा कबुलीजबाब, आरोपींमध्ये झालेले संभाषण, त्याचे ट्रान्सक्रिप्शन, सीडीआर व अन्य काही कागदपत्रे पीडितांच्या वकिलांना व अर्जदाराच्या वकिलांना दोन दिवसांत देण्याचे निर्देश दिले.