शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण शुल्क कायद्याची अंमलबजावणी पुढील वर्षी

By admin | Updated: June 10, 2014 01:39 IST

समित्यांच्या स्थापनेची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. भाजपाचे देवेंद्र फडणवीस

दोन महिन्यांत समित्यांची स्थापना
मुंबई : शिक्षण शुल्क कायद्याची अंमलबजावणी 2क्15-16 च्या शैक्षणिक वर्षापासून केली जाईल. त्यासाठी आवश्यक असलेल्या समित्यांच्या स्थापनेची  प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. 
भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. सभागृहाच्या सदस्यांनी अत्यंत मेहनत करून कायद्याचे प्रारूप तयार केले. त्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा हेच होते. विधिमंडळाने त्यास मंजुरी दिली. आता पालक आणि पाल्यांच्या हितासाठी या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. 
या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक समिती, निवृत्त जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील समिती अशा समित्यांची स्थापना करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर शुल्क निश्चितीची माहिती शाळांना सहा महिने आधी देणो आवश्यक आहे हे लक्षात घेता आगामी सत्रपासून कायद्याची अंमलबजावणी करण्यात अडचणी असल्याचे दर्डा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आपला विभाग आग्रही असल्याचे ते म्हणाले. 
समित्यांची स्थापना दोन महिन्यांच्या आत करण्यास काहीही हरकत नसावी, असे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. त्यावर तशी कार्यवाही केली जाईल, असे दर्डा यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
 
कारखाने तीन हजार; निरीक्षक केवळ पाच
1एकटय़ा कल्याण विभागात 2 हजार 935 कारखाने असून त्यांची तपासणी करण्याचे काम केवळ पाच अधिका:यांच्या भरवश्यावर सुरू असल्याची बाब आज विधानसभेत समोर आली. या अधिका:यांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी आपल्या विभागाने सामान्य  प्रशासन विभागाकडे केली आहे, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
2भाजपाचे विष्णू सावरा यांनी याबाबतचा मूळ  प्रश्न विचारला होता. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, जव्हार, वाडा, मोखाडा, शहापूर आणि भिवंडी परिसरात हे कारखाने आहेत. 
3या परिसरातील 2935 कारखान्यांपैकी 23 अतिधोकादायक आणि 249 रासायनिक आहेत. येथील कारखान्यांमध्ये एप्रिल 2क्13 ते एप्रिल 2क्14 या काळात 26 कामगारांचा विविध अपघातांत मृत्यू झाला असे मुश्रीफ यांनी सांगितले.