शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकी जपत उमविचे पुढचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 08:19 IST

शहरापासून जवळ असूनही सोयी - सुविधांपासून कोसो दूर असलेल्या रामनगरसाठी सामाजिक बांधिलकी जपत जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एक पुढचे उचलले आणि इथल्या लोकांनी विकासाचा सूर्य पाहिला

देवेंद्र पाठक / ऑनलाइन लोकमत
रामनगरची विकासाकडे वाटचाल : विद्यापिठाने दिली चक्की, सौरदिवे आणि संगणक 
धुळे, दि. 17 - रामनगर हा धुळे तालुक्यातील छोटा पाडा. शहरापासून जवळ असूनही सोयी - सुविधांपासून कोसो दूर. स्वातंत्र मिळूनही पारतंत्र्यात असल्याची लोकांची भावना. सामाजिक बांधिलकी जपत जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एक पुढचे उचलले आणि इथल्या लोकांनी विकासाचा सूर्य पाहिला... त्यांच्या चेहऱ्यावर तोच आनंद अनुभवास येत आहे. 
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘स्मार्ट व्हीलेज’ अतंर्गत खान्देशातील पाच गावे दत्तक घेतली. यात धुळे तालुक्यातील नगाव गु्रप ग्रामपंचायतीत असलेल्या रामनगर या गावाचाही समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम यांनी प्रयत्न सुरु केले. स्मार्ट व्हीलेज ही त्यांचीच एक संकल्पना. 
 
रामनगर गावात केवळ ५० घरे आहेत. भिल्ल समाजाची इथे वस्ती. लहान मोठे धरुन आजच्या स्थितीत गावाची लोकसंख्या १२० एवढी. 
गावात कुठल्याही सुविधा नव्हत्या़ एवढेच काय तर दळण दळण्यासाठी चक्की सुध्दा नव्हती. नागरिक किंवा महिलांना गावापासून ५ ते ६ किमी अंतरावर असलेल्या तिसगाव ढंढाणे अथवा वडेल या ठिकाणी दळणासाठी पायपीट करावी लागत होती. तिथून पुन्हा पायी गावाकडे येत असताना दमछाक व्हायची ती वेगळी. पावसाळ्यात तर खूपच हाल व्हायचे. 
नेमकी ही समस्या जाणून विद्यापीठाने इथे दळणासाठी चक्की देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. गावातीलच सुरेश रुपला ठाकरे यांच्यावर चक्कीची जबाबदारी सोपविण्यात आली. ते नियमित डिझेल आणतात आणि चक्की चालवितात़ या चक्कीमुळे आमचा वनवास संपला असल्याची नागरिकांची भावना आहे. सुरेश यांना यानिमित्ताने रोजगार मिळाला आणि गावातील नागरिकांना दिलासा. 
सौरदिव्यामुळे अंधार दूर
गावात वीज पुरवठा हा प्रकारच नव्हता. त्यामुळे सायंकाळ झाली की अंधारच अंधार. गाव अगदी जंगलात आहे की काय, अशी परिस्थिती व्हायची. नगाव ग्रुप ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करुनही उपयोग होत नव्हता. 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने याकडे लक्ष दिले. विद्यापीठाच्या माध्यमातून गावात दोन सौरदिवे बसविण्यात आले. सौर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात गावातील लोकांचे चेहरेही उजळून निघाले. 
 
मुलांना मिळाले संगणक 
गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे़ पहिली ते चौथीचे मिळून विद्यार्थी पटसंख्या केवळ दहा. वर्गखोली एकच असली तरी त्यांना शिक्षण मात्र नियमित देण्याचा प्रयत्न सुरु आहे़ काळ झपाट्याने बदलत असताना याठिकाणी असलेल्या मुलांना देखिल शिक्षणाच्या नव्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न विद्यापीठाने सुरु केला. मग शाळेला संगणक देण्याचे ठरले. पण गावात विजपुरवठा नाही मग संगणक चालणार कसे. यावरही विद्यापीठाने सौरउर्जेचा पर्याय शोधला. 
शाळेच्या छतावर सौरउर्जेचो पॅनल बसविण्यात आले. त्यावर दिवे आणि तीन संगणक सुरु असतात. मुलांना संगणकाची ओळख करुन दिली जात आहे़ मुलेही हसत-खेळत संगणक हाताळणी करत आहेत़ संगणकावर चित्रे काढत आहेत़ आता तर लवकरच वर्गात ई-लर्निंग सुरु करण्याचा मानस प्राथमिक शिक्षक अशोक सोनवणे यांनी बोलून दाखविला.