शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

येत्या ४८ तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता !

By admin | Updated: September 14, 2016 00:22 IST

विदर्भ, मराठवाड्यातही कोसळणार मुसळधार; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज.

अकोला, दि. १३ : सहा आठवडे प्रदीर्घ उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील ४८ तासात राज्यातील काही भागासह विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. देशात पश्‍चिम मध्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पश्‍चिम मध्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या आंध्रप्रदेश किनारपट्टीवर आहे.दरम्यान, यावर्षी राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडला. ऑगस्टच्या प्रथम आठवड्यापर्यंत पाऊस सुरू च होता; पण गत सहा आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. येत्या ४८ तासात विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी विदर्भात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १५ सप्टेंबरला मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ सप्टेंबरला कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर १७ ला उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार तसेच दक्षिण कोकण-गोवा व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.गेल्या २४ तासांत विदर्भात विशेषत: पुर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर विदर्भात बर्‍याच ठिकाणी, कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तसेच खेड, माथेरान येथे प्रत्येकी ३0 मि.मी.(३ से.मी.), रोहा २, भीरा, चिपळूण, देवगड, कर्जत, खालापूर, मंडणगड, पोलदपूर, रत्नागिरी, वेगुर्ला १ प्रत्येकी व इगतपुरी १ से.मी. पाऊस पडला. मराठवाड्यात हदगाव, किनवट प्रत्येकी २, बिल्लोली, देगलूर, हिमायतनगर, उमारी १ प्रत्येकी.विदर्भात सावली, येथे ११0 मि.मी. (११ से.मी.), मूल ९ से.मी. म्हणजेच ९0 मि.मी, ब्रह्मपुरी,वणी, वरोरा प्रत्येकी ८, आरमोरी, बल्लारपूर, गोंडपिंपरी ७, आमगाव, अर्जुनी मोरगाव, गडचिरोली, कुही, जरी झामनी येथे प्रत्येकी ६, गोंदिया, कुरखेडा, लाखणी, मौदा, नागभीर, राजुरा, सडकअर्जुनी, शिंदेवाही, उमरेड प्रत्येकी ५ से.मी. , भिवापूर, चार्मोशी, चंद्रपूर, चिमूर, गोरेगाव, कोरपना, लाखांदूर, पौनी प्रत्येकी ४ से.मी, भद्रावती, देवोरी, जोईती, मारेगाव, पोम्भुर्णा, रामटेक, सालेकसा, तिरोरा प्रत्येकी ३ ,भंडारा, धानोरा, ईटापल्ली, मोहाडीफाटा, मूलचेरा, रामटेक प्रत्येकी २ से.मी., अहिरी, भामरागड, देसाईगंज, घाटंजी, हिंगणघाट, कळमेश्‍वर, कामठी, कोची, महागाव, मूर्तिजापूर, नागपूर, पांढरकवडा, समुद्रपूर, सेलू, सिरोंचा, उमरखेड येथे प्रत्येकी १ सेमी. घाटमाथ्यावर ता१िाणी ७, डुगरवाडी ३, भीरा, शिरगाव, अम्बोणे, दावडी, कोयना (पोफळी) येथे प्रत्येकी १ से.मी. पावसाची नोंद झाली आहे.