शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बातमीपत्र बंद ही चटका लावणारी 'आकाशवाणी' !

By admin | Updated: August 10, 2016 21:45 IST

आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत.’ हे वाक्य उच्चारून छत्तीस वर्षे झाली. आज त्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे पुण्याहून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी दिल्या जाणा-या बातम्याच

पुणे, दि. 10 -  सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत.’ हे वाक्य उच्चारून छत्तीस वर्षे झाली. आज त्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे पुण्याहून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी दिल्या जाणा-या बातम्याच आज अचानक बंद करण्याचा निर्णय झाला. वाईट वाटले. त्या बातम्यांशी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातल्या चावडीवरच्या मंडळींचं जिव्हाळ्याचं नातं होतं. गावात पेपर उशिरा येत असे. दूरदर्शनचं वाहिन्याचं जाळं पसरलेलं नव्हतं. त्यामुळे चावडीवर मध्यभागी ठेवलेल्या रेडिओभोवती गावकरी बातम्या ऐकायला बसत. मी कार्यक्रमाच्या निमित्तानं गावोगावी गेली, की तिथे मला गावकरी ही गोष्ट सांगत. रेडिओवरून सांगितलं, तरच खरी बातमी, अशी भावना असल्याने उत्सुकतेनं रेडिओ पुढे बसत. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातल्या गावोगावच्या सांस्कृतिक बातम्या-उपक्रमांना पुण्याच्या बातम्यात प्राधान्य असल्याने गावागावांत या बातम्या-ऐकणं मस्ट असे. मी टीव्हीवरून झळकण्यापूर्वी, माझं नाव आणि आवाज रेडिओच्या या बातम्यांनी महाराष्ट्रभर पोहोचला. त्यामुळे माझ्या मनात तर या बातम्यांचं स्थान महत्त्वाचं! त्याकाळी म्हणजे १९७४,७६,७८,८०,८१ या वर्षात मी सुधा नरवणे या अधिकृत निवेदिकेच्या सुट्टीच्या काळात बातम्या वाचत असे. त्या वेळी ‘सात’च्या बातम्यांसाठी पहाटे साडेचार वाजता रेडिओवर जावे लागे. यूएनआय, पीटीआयच्या मशिनवरच्या बातम्या फाडून, एडिट करून, भाषांतरित करून, साधारणपणे दहा मिनिटांसाठी पंधरा पाने तयार करून ठेवावी लागत. 
‘इति वार्ता...’ हा संस्कृत बातम्यांचा शेवटचा शब्द झाला की फेडर आॅन करून आमचं ‘बातमीपत्र’ सुरू होई. अनेक जण बातमीच्या वेळेनुसार घड्याळ लावत. सकाळच्या धावपळीत घड्याळाच्या गजरासारखा बातम्यांचा उपयोग होई. बंदिस्त रुममध्ये माईकच्या पुढ्यात वाचत असताना, कधी कधी ‘सात’नंतर एखादी अगदी ताजी महत्त्वपूर्ण बातमी वृत्तसंपादक रुममध्ये टेबलावर सरकवत. न गोंधळता ती पटकन वाचावी लागे. ही बातमी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तोंडून कळतीय, याचा आनंद वेगळाच असे. स्थानिक बातम्यांना महत्त्व देणारे हे श्राव्य बातमीपत्र बंद व्हायला नको होते. 
 
- सुधीर गाडगीळ. (लेखक हे प्रसिद्ध निवेदक आहेत)