शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्राच्या पार्सल चोरट्यास अटक - बालिंग्यातील युवकास नागरिकांकडून बेदम चोप

By admin | Updated: May 7, 2014 13:32 IST

कोल्हापूर : रंकाळा एस. टी. स्टँड परिसरात आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास वृत्तपत्रांची पार्सल चोरणार्‍या तरुणास नागरिकांनी रंगेहात पकडले. यावेळी त्याची चांगलीच धुलाई करत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित प्रमोद अशोक माळी (वय ३२, रा. बालिंगा, ता. करवीर), असे त्याचे नाव आहे. त्याने वर्षभरात सुमारे २६ हजार किमतीच्या वृत्तपत्रांच्या पार्सल चोरल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.

कोल्हापूर : रंकाळा एस. टी. स्टँड परिसरात आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास वृत्तपत्रांची पार्सल चोरणार्‍या तरुणास नागरिकांनी रंगेहात पकडले. यावेळी त्याची चांगलीच धुलाई करत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित प्रमोद अशोक माळी (वय ३२, रा. बालिंगा, ता. करवीर), असे त्याचे नाव आहे. त्याने वर्षभरात सुमारे २६ हजार किमतीच्या वृत्तपत्रांच्या पार्सल चोरल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, कसबा बावडा ते रंकाळा स्टँड परिसरातून वृत्तपत्रांची पार्सल चोरीला जात होती. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार घडू लागल्याने वृत्तपत्र एजंट वैतागले होते. त्यांनी या प्रकाराची माहिती वृत्तपत्र प्रशासनास दिली होती. त्यानुसार प्रशासनाने या मार्गावर पहाटेच्या दरम्यान पाळत ठेवली असता आज पहाटे पाचच्या सुमारास रंकाळा एस.टी. स्टँड परिसरातील पार्सल चोरताना प्रमोद माळीला नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम चोप देत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. वृत्तपत्राच्या प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने २०१३ ते ६ मे २०१४ पर्यंत सुमारे २६ हजार किमतीच्या पार्सल चोरल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) ----------------पार्सलची रद्दी संशयित चोरटा प्रमोद माळी हा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या कस्टडी रूममध्ये एका कोपर्‍यात तोंड लपवून बसला होता. पार्सल चोरटा कोण आहे, याची उत्सुकता पोलिसांनाही लागून राहिली होती. पोलिसांसह वृत्तपत्रांचे छायाचित्रकार व पत्रकार त्याला पाहण्यासाठी पुढे सरसावले असता त्याने तोंड लपवून घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण एका वृत्तपत्रात गेल्या दोन वर्षांपासून पार्सल विभागात काम करत असून, घरी जाताना रंकाळा स्टँड परिसरातील पार्सल चोरून त्याची रद्दी विकल्याचे सांगितले. .....................................................फोटो : ६ कोल-प्रमोद माळी (चोरटा) नावाने आहे.