शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे आज लोकार्पण

By admin | Updated: January 6, 2015 01:06 IST

साऱ्या जगाची वार्ता दररोज आपल्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता

लोकमतने साकारली देशातील पहिली शिल्पकृती : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा नागपूर : साऱ्या जगाची वार्ता दररोज आपल्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे’ लोकार्पण मंगळवार, दि. ६ जानेवारीला नागपूर येथे करण्यात येत आहे.स्थानिक संविधान चौक (रिझर्व्ह बँकेजवळ) येथे ही शिल्पकृती उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते या शिल्पकृतीचे लोकार्पण करण्यात येईल. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्याम वर्धने उपस्थित राहतील. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. ही शिल्पकृती साकारणारे मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार किरण अदाते हेही याप्रसंगी उपस्थित राहतील.लोकशाहीला मजबूत करण्यासाठी वृत्तपत्रांच्या खांद्याला खांदा लावून प्रवास करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देशातील वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांचे प्रतीक म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने ही शिल्पकृती देशाच्या हृदयस्थळी, झिरो माईल्सजवळ संविधान चौकात उभारण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)