शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहित दांपत्याची आत्महत्या

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

केवळ आठच महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या एका दांपत्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरंदर तालुक्यातील हिवरे येथे ही घटना घडली आहे.

गराडे : केवळ आठच महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या एका दांपत्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरंदर तालुक्यातील हिवरे येथे ही घटना घडली आहे. सारिका योगेश गायकवाड (वय २२), योगेश पंढरीनाथ गायकवाड (वय २७, दोघेही रा. हिवरे, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. श्रीधर गणपत गायकवाड यांनी सासवड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री दोघेही कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यांचा सर्वत्र शोध घेतला; परंतु ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यानंतर मृत योगेश गायकवाड याचा मोठा भाऊ संतोष पंढरीनाथ गायकवाड याने सासवड पोलीस ठाण्यात २३ जून रोजी प्रथम दोघेही हरविल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान, आज शुक्रवारी( दि. २४) श्रीधर गणपत गायकवाड यांना हिवरे येथील काळेशिवार भागातील एका शेतामध्ये आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने या दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी इतर काही व्यक्तींना बरोबर घेऊन पाहणी केली असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर लगेच पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर अंत्यसंस्कारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. यासंदर्भात सासवड पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे पुढील तपास करीत आहेत.