शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक बेल्ट चॅम्पियन डीजी म्हणतात, पोलीस दल सक्षम करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 23:00 IST

पोलीस दलाला सर्वच दृष्टीकोनातून सक्षम करण्याच ध्येय

- नरेश डोंगरेनागपूर : ज्युडोमध्ये  ब्लॅक बेल्ट आणि  बॉक्सिंगमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप पटकावणारे हेमंत नगराळे यांनी राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद प्राप्त करण्यातही यश मिळवले. आता पोलीस दलाला सर्वच दृष्टीकोनातून सक्षम करणार, अशी सूचक प्रतिक्रिया नवनियुक्त पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी लोकमतला दिली.हायस्कूलपासून तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नगराळे यांनी पहिली नोकरी कोराडी थर्मल पॉवर मध्ये अभियंता म्हणून केली. नंतर ते पोलीस दलाकडे वळले. आज नगराळे यांची आज राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती झाली. नगराळे यांचे जन्मगाव चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे होय. तेथे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय शिक्षण घेतले. नंतर नगराळे यांचे कुटुंबीय नागपुरात आले. त्यांचे वडील त्यावेळी बेरार प्रांतात एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर म्हणून सेवारत होते. त्यांना दिलीप नगराळे नामक मोठे बंधू तर कीर्ती रमेश भालेकर या मोठ्या भगिनी आहेत. ही संपूर्ण मंडळी नागपुरातच राहतात.एक उत्कृष्ट ज्यूडो पटू म्हणून त्यांचा कॉलेज लाईफ मध्ये नागपुरात चांगला दरारा होता. बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या तपासामुळे राज्य पोलिस दलात प्रकाशझोतात आलेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौधरी हे नगराळे यांचे गुरु आहेत. चौधरी यांच्या पासून त्यांनी ज्यूडो आणि बॉक्सिंगचे धडे गिरविले. येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय ते ज्यूडोचा सराव करायचे. त्यांनी ज्यूडोमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावला आहे. तर  महाराष्ट्रातर्फे खेळताना  त्यांनी  उत्तर भारतात बॉक्सिंगची नॅशनल चंपियनशिपही पटकावली आहे. पोलीस दलात रूजू झाल्यानंतर त्यांनी नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे एएसपी म्हणून सेवा दिली आहे. पोलीस महासंचालक बनणारे ते नागपूर विदर्भातील पहिलेच व्यक्ती ठरले आहे. या संबंधाने त्यांच्याशी लोकमत'ने आज संपर्क केला. "ज्युडो आणि बॉक्सिंगमध्ये चॅम्पियनशिप मिळवणारे नगराळे पोलीस दलाला कसे मजबूत बनविणार, असा थेट प्रश्न केला असता, आज जास्त बोलणे योग्य होणार नाही. मात्र  राज्य पोलिस दलाला सर्वांगाने सक्षम बनविणार", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.खूप गर्व वाटतो : पुरुषोत्तम चौधरी हेमंत नगराळे राज्याच्या पोलिस दलाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्याचा खूप गर्व वाटतो, अशी प्रतिक्रिया नगराळे यांना ज्यूडोचे धडे देणारे निवृत्त पोलिस अधिकारी पुरुषोत्तम चौधरी यांनी दिली. तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया नगराळे यांचे जावई आणि मध्य भारताचे निवृत्त मुख्य स्फोटक नियंत्रक रमेश भालेकर यांनी दिली