शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेह-यांना संधी मिळणार

By admin | Updated: May 8, 2016 21:56 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवी झेंडी दिली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 8- रविवारी दुपारी संघ मुख्यालयात संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने नागपुरात दाखल झाले. महालातील संघ मुख्यालयात जाऊन संघ पदाधिकाऱ्यांशी जवळपास तासभर चर्चा केली. या चर्चेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवी झेंडी दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागपुरात येत संघाशी चर्चा केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे कौटुंबिक कामासाठी सकाळीच नागपुरात दाखल झाले. यानंतर दुपारनंतर संघ मुख्यालयात संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी नागपुरात दाखल झाले. क्षेत्रीय प्रचारक रवी जोशी, प्रदेश भाजपचे संघटन मंत्री रवींद्र भुसारी, महानगर संघचालक राजेश लोया या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सायंकाळी ६ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने विमानाने नागपुरात दाखल झाले व महालातील संघ कार्यालयात पोहोचले. तेथे या सर्व नेत्यांची तासभर बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळात असलेल्या कोणत्याही मंत्र्याला कमी करून नाराजी ओढवून घेण्यापेक्षा चांगले काम करीत असलेल्या इतर नेत्यांना विस्तारात सामावून घ्यावे, असे या बैठकीत ठरले. पुढील वर्षात होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे गणित आखून कुणाला संधी देणे फायद्याचे ठरेल, यावर विचारमंथन झाले. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस मुंबईसाठी रवाना झाले. बैठकीनंतर संघ व भाजपमधील कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. सेनेविरोधात आक्रमक भूमिका- शिवसेनेचे नेते या ना त्या मुद्यावरून सातत्याने भाजप नेत्यांना लक्ष्य करीत आहेत. पुढे महापालिकेच्या निवडणुका आहेत. शिवसेना वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात आतापासूनच आक्रमक व्हायचे की ह्यवेट अ‍ॅण्ड वॉचह्णची भूमिका घ्यायची, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. - दुष्काळ व विदर्भावरही चर्चाप्राप्त माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील दुष्काळ व वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या हालचाली यावरही चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांची भेट घेत दुष्काळ निवारणासाठी मदतीची मागणी केली होती. या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली; सोबतच वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरही संघ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले.