शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

न्हावरेत नवविवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: April 27, 2016 01:37 IST

न्हावरे (ता. शिरूर) येथे नवविवाहितेने नवरा, दीर, सासरा यांच्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. विवाहानंतर दोनच महिन्यांत ही घटना घडली.

न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथे नवविवाहितेने नवरा, दीर, सासरा यांच्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. विवाहानंतर दोनच महिन्यांत ही घटना घडली.रेश्मा विकास पवार (वय २१, रा. न्हावरे) असे विवाहितेचे नाव आहे. रेश्माचा पती विकास काळू पवार, सासरा काळू पवार, दीर प्रकाश काळू पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास व काळू पवार यांना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पवार अद्याप फरार आहे. दोन महिन्यांपूर्वीच २ फेब्रुवारी रोजी रेश्मा आणि विकास यांचा विवाह झाला होता. या लग्नसमारंभासाठी रेश्माचे वडील बाळासाहेब ताय्याप्पा गुंजाळ यांनी मोठा खर्च केला होता. लग्नानंतर विकास, काळू, प्रकाश व्यवसाय वाढवण्यासाठी तिच्याकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी मागणी करीत होते. तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते. विकास पवार याला एक तरुणी नेहमी फोन करीत असे, याबाबत रेश्माने प्रकाशला विचारणा केल्यानंतर तो तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत व मानसिक त्रास देत असे. १८ एप्रिल रोजी रेश्मा तिच्या बहिणीच्या लग्नासाठी माहेरी गेली होती. सासरा, नवरा, दीर माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणून खूप छळतात, असे तिने वडील बाळासाहेब गुंजाळ यांना सांगितले. पुन्हा तिला नवरा, सासरे, दीर यांच्याकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने काल सोमवार (दि. २५) रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रेश्माच्या आत्महत्येची वार्ता समजताच तिच्या माहेरहून (बारलोणी, ता. माढा) सुमारे १५० नातलग न्हावरे येथे आले होते. सकाळी न्हावरे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पोलिसांनी रेश्माचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. परंतु जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा रेश्माच्या नातलगांनी घेतला. दरम्यान, रेश्माचा मृतदेह त्यांच्या नातलगाच्या ताब्यात देताना उपस्थित नातेवाइकांच्या अश्रूंचा बांध फुटला. रेश्माचे एम.ए.पर्यंत शिक्षण झाले होते. पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे, पोलीस हवालदार प्रल्हाद जगताप, विकास कापरे करीत आहेत.