शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

नव्या वर्षातही लोकलचा ‘वक्तशीरपणा’ घसरला

By admin | Updated: January 8, 2017 02:26 IST

मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांत तांत्रिक बिघाडानंतरही लोकलचा वक्तशीरपणा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. २0१७मध्येही लोकल वेळेवर धावतील असे वाटत असतानाच

मुंबई : मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांत तांत्रिक बिघाडानंतरही लोकलचा वक्तशीरपणा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. २0१७मध्येही लोकल वेळेवर धावतील असे वाटत असतानाच गेल्या पाच दिवसांत वक्तशीरपणा चांगलाच घसरला. दररोज सरासरी ८८ टक्क्यांहून अधिक असणाऱ्या वक्तशीरपणात घसरण होऊन पाच दिवसांत तो ८२ टक्क्यांवर आला. त्यामुळे नव्या वर्षात तरी मध्य रेल्वेवरील लोकल वेळेवर धावणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मध्य रेल्वेमार्गावर अनेक तांत्रिक बिघाड होत असल्याने लोकल वेळेवर धावत नाहीत आणि त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. एप्रिल ते डिसेंबर २0१६ दरम्यान जवळपास १,५00 विविध तांत्रिक बिघाड झाले. यामध्ये सर्वाधिक बिघाड लोकल व इंजिनातील असतानाच त्यानंतर सिग्नल, ओव्हरहेड वायर आणि रुळांना तडा गेल्याचे आहेत. तर २0१५-१६मध्ये १ हजार १७0 तांत्रिक बिघाड झाले आहेत. या बिघाडांनंतरही २0१६मध्ये लोकलचा वक्तशीरपणा ८८ टक्क्यांपर्यंत राहिला. तर २0१५मध्ये ८६ टक्के एवढा वक्तशीरपणा होता. यातही डिसेंबर २0१६ मध्ये तांत्रिक बिघाडांचा सामना करूनही ८८.८८ टक्केपर्यंत वक्तशीरपणा गेला. नव्या वर्षात यात सुधारणा होऊन लोकल वेळेवर धावतील, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग झाल्याचे दिसून आले. २0१७मधील पहिल्या पाच दिवसांचा मिळून लोकलचा वक्तशीरपणा हा ८२.३ टक्क्यांपर्यंत राहिला. पाच दिवसांतच मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाडांचा सामना मध्य रेल्वेला करावा लागला. यात ट्रेनमधील बिघाड तीनपेक्षा अधिक, रुळाला तडा चारहून अधिक घटना तर सिग्नलमधील बिघाड २५पेक्षा जास्त घडल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळेच लोकल वेळेवर धावू शकल्या नाहीत.