शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षाची झकास सुरुवात!

By admin | Updated: February 24, 2017 06:12 IST

सन २०१७ या वर्षाची ही झकास सुरुवात आहे. आधी ओडिशात अभूतपूर्व असा पाठिंबा मिळाला

नवी दिल्ली : सन २०१७ या वर्षाची ही झकास सुरुवात आहे. आधी ओडिशात अभूतपूर्व असा पाठिंबा मिळाला व आता महाराष्ट्रातील जनतेने भरभरून आशीर्वाद दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमधील भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्र भाजपाच्या संपूर्ण टीमने लोकांमध्ये जाऊन केलेल्या अथक कामानेच पक्षाला हे यश मिळाले, असे नमूद करून पंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन दिले.भाजपा नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व भाजपाने पुन्हा एकत्र यावे, अशी भावना बोलून दाखवली आहे. ते कदाचित त्यासाठी पुढाकार घेतील, अशी शक्यता आहे.शिवसेनेच्या मुंबईतील कामगिरीबद्दल उद्धव ठाकरे फारसे समाधानी नसून, ताकद असूनही जिथे उमेदवार पराभूत झाले, तेथील शाखाप्रमुख व विभागप्रमुख यांना दूर केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्यांनी भाजपाने सत्ता व संपत्तीचा प्रचंड वापर केला आणि मतदारयादीतून नावे गायब होणे हे षडयंत्र असू शकेल, असे म्हटले आहे.बीडच्या परळी पंचायत समितीमध्ये भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देउ केला. पण प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी तो न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या पराभवामुळे सहकार राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की या पराभवामुळे पक्ष वा नेते खचून गेलेले नाहीत. निवडणुकीत हार-जीत होतच असते. या पराभवाची पक्षाचे नेते निश्चितच मिमांसा करतील. (विशेष प्रतिनिधी)भाजपाच्या विकासाच्या धोरणांवर विश्वास दाखवून ‘सबका साथ, सबका विकास’ या अ‍ॅजेंड्याला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी अभिनंदन केले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, ओडिशात स्पर्धेबाहेर फेकली गेलेली काँग्रेस महाराष्ट्रात तिसऱ्या-चौथ्या स्थानावर गेली. महत्त्वाची राज्ये भाजपा स्वबळावर जिंकू शकते, हेच या दोन्ही राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे.

( BMC ELECTION RESULT : ईश्वर चिठ्ठी भाजपाच्या नावे )

(  BMC ELECTION RESULT - शिवसेनेचा सूर्य कधीच मावळणार नाही- संजय राऊत )