२०१३ वर्षीच्या तुलनेत -९.०७ टक्के फरक : औद्योगिक विकास खुंटल्याचा परिणामसुमेध वाघमारे - नागपूरनागपुरात वर्ष २०१२मध्ये ७० हजाराने वाहनांची संख्या वाढली. या वाढत्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली होती, परंतु २०१३ पासून नव्या वाहनांच्या विक्रीवर ब्रेक लागला आहे. परिणामी २०१३च्या तुलनेत मागील वर्षी उणे ९.०७ टक्के फरक पडला आहे. सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती आणि औद्योगिक विकास खुंटल्याने याचा फटका वाहन विक्रीवर झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दुचाकी, आॅटोरिक्षा, टॅक्सी, कार, ट्रक, टेम्पो आणि बस आदी वाहनांची संख्या २०१२ मध्ये झपाट्याने वाढली. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूककोंडी, पार्किंगची समस्या निर्माण झाली. वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याच्या समस्येला नागपूरकर सामोरे जात असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या वाहनांच्या तुलनेत ५ हजार १५८ वाहनांची नोंद कमी झाली. २०१२ मध्ये नव्या ४९ हजार ९५ वाहनांची खरेदी झाली, २०१३ मध्ये यात ४३ हजार ८६० तर २०१४ मध्ये ३८ हजार ७०२ खरेदी झाली.दुचाकींची संख्या ४ हजार ९२१ने घटलीनागपुरात एकूण १४ लाख ९ हजार ७७८ वाहने आहेत. यात १२ लाख ६९ हजार ८२९ दुचाकी आहेत. २०१२ मध्ये ४१ हजार २४९ नव्या दुचाकींची नोंद झाली होती, या तुलनेत २०१३ मध्ये ३७ हजार ८६२ तर २०१४ मध्ये ३२ हजार ९४१ वाहनांची नोंद झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९२१ने घट आली आहे. मागील वर्षी फक्त ५ हजार ७६१ नव्या कारशासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक कंपन्यांचे खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने २०१२ पर्यंत दुचाकीएवेजी चारचाकी खरेदीकडे अनेकांचा कल होता. मात्र २०१३ पासून ही संख्या कमी होत गेली, ती मागील वर्षांपर्यंत कायम होती. २०१२ मध्ये ७ हजार ८४६ नव्या कार्सची नोंद झाली. २०१३ मध्ये ५ हजार ९९८ तर २०१४ मध्ये ५ हजार ७६१ कारची नोंद झाली. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत २३७ कारची संख्या कमी झाली आहे. रस्ते अपघातही घटलेनव्या वाहनांची कमी झालेली संख्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील वर्षीपासून व्यापक प्रमाणात केलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृतीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत नागपुरातील अपघातांच्या प्रमाणात ११६ ने घट झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत मृतांचा आकडा वाढला आहे. २०१३ मध्ये १२६५ अपघात झाले. यात २५५ जणांचा मृत्यू झाला तर २०१४ मध्ये ११४९ अपघात झाले असून यात २६३ जणांचा मृत्यू झाला.
नव्या वाहनांना ब्रेक!
By admin | Updated: January 26, 2015 00:58 IST