शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

पोलिओची नवीन लस

By admin | Updated: April 2, 2016 01:42 IST

देशात असलेल्या पोलिओ रुग्णांमध्ये पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्ण आहेत. तथापि, पी २ विषाणूबाधित रुग्ण देशात नाहीत. त्यामुळे येत्या २५ एप्रिलपासून पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमात

- पूजा दामले,  मुंबईदेशात असलेल्या पोलिओ रुग्णांमध्ये पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्ण आहेत. तथापि, पी २ विषाणूबाधित रुग्ण देशात नाहीत. त्यामुळे येत्या २५ एप्रिलपासून पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमात बदल करण्यात येणार आहे. पोलिओसाठी देण्यात येणाऱ्या लसीमध्ये तीन विषाणूंऐवजी पी १ आणि पी ३ या दोन विषाणूंसाठी लस तयार केली आहे.पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो. तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण न आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त’ घोषित केले. सध्या देशात पोलिओच्या रुग्णांमध्ये पी १ विषाणूबाधित रुग्णांची संख्या अधिक असून पी ३ विषाणूबाधित रुग्णदेखील आहेत. आता पी २ विषाणूमुळे पोलिओ होण्याचा धोका राहिलेला नाही. याआधी ३ लसी एकत्र करून दिल्या जात होत्या. आता २ लसी एकत्र करून दिल्या जाणार आहेत. आता ‘बायव्हॅलिड ओरल पोलिओ व्हॅक्सिन’ देण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. आर.आर. शिंदे यांनी दिली. बाळ जन्मल्यावर सहाव्या, दहाव्या आणि सोळाव्या आठवड्यात लसीकरण केले जाते. यापुढे सोळाव्या आठवड्यात लस देताना पोलिओची नवी लस टोचली जाणार आहे. जगभरात एप्रिल २०१६मध्ये हा बदल होणार असून देशात २५ एप्रिलला हा बदल होईल. या दिवसापासून पोलिओसाठीचा तीन लसींचा वापर पूर्णपणे बंद केला जाणार असून नवीन लस दिली जाणार आहे, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. डॉ. शिंदे पुढे म्हणाले, पोलिओ कोणत्या विषाणूमुळे झाला आहे, हे पाहून कळत नाही. पोलिओ रुग्णाची स्टूल तपासणी केल्यावर पोलिओ नक्की कोणत्या विषाणूमुळे झाला आहे, हे स्पष्ट होते. आता ‘बायव्हॅलिड ओरल पोलिओ व्हॅकसिन’चा वापर फायदेशीर ठरणार आहे.