शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नव्या इमारतींसाठी नवीन कर आकारणी

By admin | Updated: February 16, 2015 03:27 IST

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने नवीन इमारती झाल्या आहेत. त्या इमारतींना नवीन कर

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने नवीन इमारती झाल्या आहेत. त्या इमारतींना नवीन कर आकारणी होणार असल्याने विकासकांमध्ये खळबळ उडाली आहे.शासनाने भिवंडी नगरपालिकेच्या मर्यादित क्षेत्रात महानगरपालिका स्थापन करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, २००३ साली विकास आराखडा जाहीर झाला़ परंतु, सुरुवातीला तत्कालीन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून शहरात अपेक्षित व टिकाऊ विकासकामे झाली नाहीत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मनपा क्षेत्रातील विकासकामांना जोर धरला असून उंच टॉवरची बांधकामे सुरू झाली आहेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांना सोयीसुविधा पुरविण्याची मागणी करण्यात येते. या सुविधा पुरविण्याच्या निमित्ताने नगररचना विभागाने नवीन इमारतींचा विकासदराचा वेगळा संचय करून त्यांना सुविधा प्रदान करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे नवीन इमारतींच्या रहिवाशांना सर्व सोयीसुविधा मिळणार आहेत. भिवंडी महानगरपालिका १४ वर्षांपासून अस्तित्वात आली. परंतु, जुन्या व नवीन अशा सर्व इमारतींना एकाच पट्टीने मोजून कर आकारणी केली जात होती. महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून दरवर्षी १ एप्रिलपासून शहरात नवीन होणाऱ्या इमारतींना नवीन दराने कर आकारणी करण्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी ठरविले आहे. त्यामुळे शहरातील विकासकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)