शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नूतन शालिवाहन शकवर्षाचा मंगळवारी प्रारंभ!

By admin | Updated: March 26, 2017 05:58 IST

मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी श्री शालिवाहन शके १९३९ हेमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत असून

मुंबई : मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी श्री शालिवाहन शके १९३९ हेमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत असून हे नूतन वर्ष शनिवार १७ मार्च २०१८ रोजी समाप्त होणार आहे आणि पुढच्या वर्षी गुढीपाडवा दहा दिवस अगोदर १८ मार्च २०१८ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.या नूतन शालिवाहन शकवर्ष १९३९ मध्ये दोन चंद्रग्रहणे व दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी सोमवार ७ आॅगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तसेच बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. त्या वेळी खग्रास स्थितीमध्येच चंद्र उगवताना दिसणार आहे. खगोलप्रेमी छायाचित्रकारांनाही ती एक पर्वणी असणार आहे.२१ आॅगस्ट २०१७ आणि १५ फेब्रुवारी २०१८ रोजी होणारी सूर्यग्रहणे मात्र भारतातून दिसणार नाहीत. या नूतन शक वर्षात १३ जून आणि ७ नोव्हेंबर अशा दोन अंगारकी चतुर्थी होणार आहेत. सुवर्ण खरेदी करणाऱ्यांसाठी ९ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबर असे दोन गुरुपुष्ययोग असणार आहेत. या नूतन वर्षी १५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात गुरू ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्याने दिसू शकणार नाही. तेजस्वी शुक्र ग्रह १६ डिसेंबर २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ सूर्यतेजात लुप्त झाल्याने आपणास दिसू शकणार नाही. प्राचीन पद्धतीप्रमाणे सर्व पंचांगात पर्जन्य अंदाज दिलेले असतात. नूतन वर्षी पाऊस चांगला पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या नूतन वर्षी सर्व सण-उत्सव मागील वर्षापेक्षा १०-११ दिवस अगोदर येणार आहेत, असे सोमण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नवीन वर्षात चांगला पाऊस सोमवार ७ आॅगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तसेच बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी होणारे खग्रास चंद्रग्रहणही आपल्याला दिसेल.तेजस्वी शुक्र ग्रह १६ डिसेंबर २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ सूर्यतेजात लुप्त झाल्याने आपणास दिसू शकणार नाही. प्राचीन पद्धतीप्रमाणे सर्व पंचांगात पर्जन्य अंदाज दिलेले असतात. नूतन वर्षी पाऊस चांगला पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. सोमवारी रात्रीपासून बाप्पाचे दर्शनमुंबईतील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात हिंदू नवीन वर्षानिमित्त म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन दररोजच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी २८ मार्चला मंदिर पहाटे १.३0 ते रात्री १२ वाजेपर्यंत बाप्पाच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या दिवशी पहाटेच्या आरतीची वेळ पहाटे ५ पासून ते ५.३0 पर्यंत ठेवण्यात आली आहे. तर नैवेद्याची वेळ दुपारी १२ ते १२.३0 पर्यंत ठेवण्यात आली आहे. सायंकाळची महापूजा आणि आरतीची वेळ ९ ते रात्री १०.१० अशी ठेवण्यात आली आहे आणि शेजारती ही मंगळवारी रात्री १२ वाजता होईल. गुढीपाडव्यानिमित्त करण्यात आलेल्या या बदलाची दखल भाविकांनी घ्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.