शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू लिलावासाठी नवीन धोरण

By admin | Updated: February 24, 2016 01:04 IST

वाळू लिलावीच्या पद्धतीकरिता नवीन धोरण व वेळापत्रक आणणार असून गौण खनिजाच्या उत्खननासाठी जिल्हास्तरीय तज्ञ मूल्यांकन समिती व पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाची

मुंबई : वाळू लिलावीच्या पद्धतीकरिता नवीन धोरण व वेळापत्रक आणणार असून गौण खनिजाच्या उत्खननासाठी जिल्हास्तरीय तज्ञ मूल्यांकन समिती व पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल, अशी महिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या नवीन वेळापत्रकानुसार १ आॅक्टोबर ते पुढील वर्षीच्या १ आॅक्टोबरपर्यंत लिलावाधारकास हक्क देण्यात येतील. यामुळे वाळू बारा महिने उपलब्ध होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.खडसे म्हणाले, गौण खनिजाच्या उत्खननासाठी यापूर्वी पर्यावरण अनुमतीचे प्रस्ताव राज्यस्तरीय तज्ञ समिती व राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण यांच्याकडे येत होते. यामुळे प्रस्तावांना अनुमती देण्यासाठी विलंब होत होता. याकरिता पाच हेक्टरपेक्षा कमी वाळू व इतर गौण खनिज उत्खननासाठीचे प्रस्ताव जिल्हास्तरीय तज्ञ मूल्यांकन समिती व पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण यांच्याकडे सादर करण्यात येतील. जिल्हाधिकाऱ्यांना पाच हेक्टरपर्यंत अनुमती देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.वाळू, रेती लिलावाच्या वेळापत्रकानुसार जून महिन्यापर्यंत वाळू, रेती गट निश्चिती करणे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, ग्रामसभा यांच्याकडून लिलावाबाबत प्रमाणपत्र घेण्यात येईल आणि आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून पर्यावरण अनुमती प्राप्त करुन घेण्यात येईल तसेच सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत लिलावाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. खडसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुरामुळे तयार झालेले वाळूचे ढीग काढून टाकणे, ग्रामपंचायतीच्या कामासाठी तसेच सार्वजनिक कामांसाठी पारंपरिक पध्दतीने वाळू उत्खनन करणे, गावातील तलावातून गाळ काढणे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत बांधावयाचे बांध, गावातील रस्ते, तलाव आदी शासकीय योजनांच्या कामासाठी, सिंचन व पिण्याच्या पाण्याकरिता विहीर खोदणे आदी कामांकरिता सूट देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)