शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जननी सुरक्षा योजनेचे नवे धोरण किचकट

By admin | Updated: May 21, 2014 00:14 IST

७00 रुपयांच्या अनुदानासाठी ५00 रुपयांचा खर्च

मूर्तिजापूर: आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय बाळंतीण महिला आणि नवजात शिशूच्या चांगल्या आरोग्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जननी शिशू सुरक्षा योजनेचे नवे धोरण अतिशय किचकट असून, केवळ ७00 रुपयांचे अनुदान घेण्यासाठी बाळंतीण महिलेला ५00 रुपये खर्च करावे लागत आहे. त्यामुळे मूर्तिजापुरात या योजनेचा फ ज्जा उडाल्याचे दिसत आहे. शासनातर्फे नागरिकांच्या कल्याणासाठी नवनव्या योजना अस्तित्वात आणल्या जात आहेत. त्या सर्व योजना कल्याणकारी आणि स्वागतार्ह आहेत. त्यापैकीच एक अशी जननी शिशू सुरक्षा योजना आहे. शासनाने अनुसूचित जाती-जमातींमधील गरीब कुटुंबातील बाळंतीन महिला व तिच्या नवजात बाळाला योग्य आहार मिळावा म्हणून ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गर्भवती महिलेचे बाळंतपण सामान्य झाल्यास ७00 रुपये, तर बाळंतपणासाठी शस्त्रक्रिया (सिझेरीयन) करावी लागल्यास १५00 रुपये अनुदान देण्यात येते. सुरुवातील हे अनुदान बाळंतीण महिलेस रोख स्वरूपात देण्यात येत होते. त्यानंतर शासनाने त्यात थोडी सुधारणा केली आणि सदर योजनेचे अनुदान लाभार्थी महिलेस बेरर चेकच्या स्वरूपात देणे सुरू केले. ही पद्धत अगदी योग्य होती. बेरर चेक नावे असलेली व्यक्ती आपले ओळखपत्र देऊन सहज अनुदानाचा लाभ घेत होती; परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी शासनाने बेरर चेक देण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी अकाऊंट पेयी चेक देण्याची पद्धत सुरू के ली. या पद्धतीनुसार लाभार्थी महिलेला मिळालेला अकाऊंट पेयी चेक वटविण्यासाठी स्वत:च्या नावे बँकेत खाते उघडावे लागते. गंमत म्हणजे ७00 रुपयांचे अनुदान घेण्यासाठी ५00 रुपये खचरून बँक खाते उघडावे लागत आहे. त्यामुळे ह्यआठ आण्याची कोबंडी आणि बारा आण्याच्या मसालाह्ण, अशीच काहीसी ही पद्धत झाल्याचे बोलले जात आहे. या पद्धतीचा अवलंब झाल्यापासून मूर्तिजापूर तालुक्यात एप्रिल महिन्यात ६५ महिलांना या पद्धतीनुसार अकाऊंट पेयी चेक देण्यात आले; परंतु नवीन धोरणामुळे त्यापैकी एकाही महिलेस अनुदानाचा लाभ घेता आला नाही त्यामुळे जननी सुरक्षा योजनेचा मूर्तिजापुरात पार फज्जा उडाला आहे.