शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत नवीन अधिकाऱ्यांची भरती होणार

By admin | Updated: December 7, 2015 01:50 IST

एसटी महामंडळात १८0पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्याने तात्पुरता भार अन्य अधिकाऱ्यांना सोसावा लागत आहे. बढतीबाबत निर्णय घेणाऱ्या एसटीच्या विभागीय बढती समितीची

मुंबई : एसटी महामंडळात १८0पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्याने तात्पुरता भार अन्य अधिकाऱ्यांना सोसावा लागत आहे. बढतीबाबत निर्णय घेणाऱ्या एसटीच्या विभागीय बढती समितीची तीन वर्षांपासून बैठकच न झाल्याने या बढत्या रखडल्याचे समोर आले आहे. त्याबाबत परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडून अद्यापही निर्णय घेण्यात आला नसून उलट नवीन अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडे सध्या १ लाख ७ हजार कर्मचारी व कामगार आहेत. तर जवळपास १० हजारपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. यातही राज्यात सध्या कार्यरत असणाऱ्या एसटी अधिकाऱ्यांना कामाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. कामाच्या अतिरिक्त भारामुळे एसटी महामंडळातील कामे धीम्या गतीने होत असून, कामाचा बोजवारा उडाला आहे. जवळपास १८0पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची बढती रखडल्याने हा बोजवारा उडाल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र त्याबाबत एसटी प्रशासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. एसटी महामंडळात विभागीय बढती समिती असून, या समितीमार्फतच अधिकारी, कर्मचाऱ्यांची बढती होत असते. आॅक्टोबर २0१२मध्ये एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे असताना या समितीची बैठक झाली होती. ही बैठक झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत समितीची बैठकच झालेली नाही. त्याचा फटका १८0पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना बसला असून, बढतीअभावी त्यांना पूर्वीच्याच पदावर काम करावे लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, मॅकेनिकल इंजिनीअर, सुरक्षा अधिकारी, अकाउंट अधिकारी, कर्मचारी वर्ग आदी पदांचा यात समावेश आहे. या बढत्या रखडल्या असतानाच ७४ नवीन अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया एसटी महामंडळाने सुरू केली आहे. नवीन भरतीसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली असून, डिसेंबरच्या अखेरपर्यंत त्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. भरती करण्यात येणाऱ्या पदांमध्ये आगार व्यवस्थापक, कामगार व्यवस्थापक इत्यादी पदे असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)2012 च्या आॅक्टोबर महिन्यात समितीच्या झालेल्या बैठकीनुसार मे २0१३मध्ये बढतीचा निकाल लागला आणि त्वरित भरतीही झाली. मात्र त्यानंतर अनेक अधिकारी निवृत्त झाल्यानंतर बढती समितीकडून त्याबाबत आढावाही घेण्यात आलेला नाही.