शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

५०० वर्षांपूर्वीच्या तंत्राने मिळाले नवे नाक, नगरच्या तरुणीवर दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 05:55 IST

युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी इटलीमध्ये ५०० वर्षांपूर्वी विकसित केलेल्या तंत्राने दुर्मीळ शस्त्रक्रिया करून येथील गोकूळदास तेजपाल (जीटी) इस्पितळातील डॉक्टरांनी १८ वर्षांच्या नगरच्या तरुणीला नवे नाक बसविले!

मुंबई : युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी इटलीमध्ये ५०० वर्षांपूर्वी विकसित केलेल्या तंत्राने दुर्मीळ शस्त्रक्रिया करून येथील गोकूळदास तेजपाल (जीटी) इस्पितळातील डॉक्टरांनी १८ वर्षांच्या नगरच्या तरुणीला नवे नाक बसविले!जन्मत:च एक नाकपुडी नसल्याने इतकी वर्षे चपटे नाक घेऊन लाजेने जगणाºया व श्वसनाचा त्रास सहन करणाºया कोमल डहाळे हिला या शस्त्रक्रियेमुळे नवे आयुष्यच मिळाले. लातूर व अहमदनगरमध्ये कोमलवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कुटुंबीयांनी बरेच प्रयत्न केले.‘टॅग्लिआकॉझी’ या शस्त्रक्रिया पद्धतीत एका हातातून रक्तवाहिन्यांसह एक त्वचेची नळी तयार केली जाते. ती नळीची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत जवळपास चार आठवडे लागतात. त्याच्याखाली आपल्या शरीरातील सपोर्टसाठी कुठल्या तरी भागाची थोडीशी चामडी लावली जाते.त्यातून रक्तपुरवठा होत असतो. त्यानंतर या नळीच्या एका बाजूचा रक्तप्रवाह कमी केला जातो आणि ती नळी तीन आठवड्यानंतर नाकाला जोडली जाते.शस्त्रक्रिया करुन नाकाच्या भागात मांसासह तिथे ती नळी फिक्स केली जाते. त्यानंतर त्या रुग्णाला त्याचा हात जवळपास तीन आठवडे तसाच ठेवावा लागतो. नाक तयार झाल्यानंतर त्वचेची नळी नाकापासून वेगळी केली जाते.या संपूर्ण शस्त्रक्रियेला एकूण तीन महिने लागतात.कोमलचे नाक अजून पूर्ण तयार झालेले नाही. जखमेचे टाके भरू लागले की, त्यावरील अतिरिक्त त्वचा काढून टाकण्यात येईल. जेणेकरून कोमलच्या चेहºयाप्रमाणे नाकाचा आकार ठरविता येईल.- डॉ. नितीन मोकल,विभागप्रमुख प्लास्टिक सर्जरी,जीटी रुग्णालय