शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅक’कडून मूल्यांकनासाठी नवीन पद्धत

By admin | Updated: May 23, 2016 05:04 IST

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या मुल्यांकनासाठी ‘नॅक’ने (नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) नवीन आठ श्रेणी पद्धती (ग्रेडेशन) जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येणार आहे

नजीर शेख, औरंगाबादविद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या मुल्यांकनासाठी ‘नॅक’ने (नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) नवीन आठ श्रेणी पद्धती (ग्रेडेशन) जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येणार आहे. नव्या धोरणानुसार आता ‘ए’ ग्रेडमध्ये सुधारणा करून ‘ए ए प्लस’ आणि ‘ए प्लस प्लस’ असे ग्रेड राहणार आहेत. बंगळुरू येथील ‘नॅक’ संस्थेचे संचालक डी. पी. सिंग यांनी यासंदर्भातील आदेश नुकतेच जाहीर केले आहेत. प्रचलित पद्धतीमध्ये ‘नॅक’तर्फे डी (१ ते १.५ सीजीपीए), सी (१.५१ ते २.०० सीजीपीए), बी (२.०१ ते ३.०० सीजीपीए) आणि ए (३.०१ ते ४.०० सीजीपीए) असे ग्रेड देण्यात येतात. मात्र आता बी आणि ए ग्रेडअंतर्गत प्रत्येकी तीन श्रेणी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. नव्या पद्धतीनुसार डी आणि सी ग्रेड कायम राहणार आहेत. बी ग्रेडअंतर्गत ‘बी बी प्लस’ आणि ‘बी प्लस प्लस’, असे तीन ग्रेड राहतील. त्याच धर्तीवर ए ग्रेडमध्ये ‘ए ए प्लस’ आणि ‘ए प्लस प्लस’ असे तीन गे्रड राहतील. पूर्वी ज्या महाविद्यालय किंवा विद्यापीठांची एकत्रित श्रेणी बिंदू सरासरी (सीजीपीए) ३.०१ पासून ते ४ पर्यंत होती. ती सर्वच महाविद्यालये किंवा विद्यापीठे ए ग्रेडमध्ये गणली जात होती. आता ए ग्रेडमध्येच तीन टप्पे करण्यात आले असल्याने अतिउच्च (ए प्लस प्लस) ग्रेड प्राप्त करणाऱ्या संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निधी मिळण्यासाठी फायदा होणार आहे. ३० जूनपर्यंत ज्या संस्थांचे ‘नॅक’चे मूल्यांकन होणार आहे, त्या संस्थांना मात्र सध्या प्रचलित असलेली चार ग्रेडेशन पद्धत लागू राहणार असल्याचेही नॅकच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. असे असेल नवे ग्रेडेशनसीजीपीएग्रेडस्थिती३.७६ ते ४.०० ए प्लस प्लसमान्यताप्राप्त ३.५१ ते ३.७५ ए प्लस मान्यताप्राप्त ३.०१ ते ३.५० ए मान्यताप्राप्त२.७६ ते ३.०० बी प्लस प्लसमान्यताप्राप्त२.५१ ते २.७५बी प्लसमान्यताप्राप्त२.०१ ते २.५०बीमान्यताप्राप्त१.५१ ते २.०० सीमान्यताप्राप्त०० ते १.५० डी अमान्यताप्राप्त