शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले पर्यटनवृद्धीसाठी नवी शक्कल!

By admin | Updated: May 14, 2014 01:59 IST

महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे जतन करीत तेथे पर्यटनवृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नवा प्रकल्प हाती घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे जतन करीत तेथे पर्यटनवृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नवा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून राज्यातील किल्ल्यांचा विकास करण्यात येणार आहे.देशोदेशीच्या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा आनंद घ्यावा, त्या माध्यमातून किल्ल्यांची महती परदेशातील अभ्यासकांना आणि पर्यटकांना व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील ३५० किल्ल्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण २० वर्षांचा कालावधी लागणार असून त्यासाठी प्रत्येक किल्ल्याला अडीच कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत किल्ल्याच्या आवारात पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. प्रकल्पातील काही किल्ले केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित तर काही किल्ले राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागात अंर्तभूत आहेत. मात्र राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाल्यामुळे त्या अंतर्गत असणार्‍या किल्ल्यांचे काम सुरु झाले आहे. पर्यटनवृद्धीसाठीच्या या प्रकल्पात मुख्यत्त्वे किल्ल्याकडे जाणारा मार्ग, पाण्याचे व्यवस्थापन, फराळाचे स्टॉल्स, किल्लेभ्रमंतीसाठी योग्य सोयी-सुविधा, पर्यटकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रकल्पातील पहिल्या सहा किल्ल्यांचे काम सुरु झाले असून त्यात राजगड, तोरणा, राजमाची, लोहगड, सिंहगड आणि शिवनेरीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)..........................गेल्या काही वर्षांत किल्ल्यांच्या दुरावस्थेमुळे दुर्गवैभवाकडे पर्यटकांचे दुर्लक्ष झाले आहे. मात्र किल्ले पर्यटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एमटीडीसीचा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा एकदा किल्ले पर्यटनाला बहर येईल. याशिवाय, काही किल्ल्यांच्या डागडुजीचे कामही पुरातत्त्व विभागामार्फत सुरु असल्याने महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे संवर्धन होईल.- राहुल वसईकर, कार्यकारी अभियंता, एमटीडीसी.........................