शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साठे महामंडळात नवा कार घोटाळा

By admin | Updated: July 5, 2015 03:02 IST

३७५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांसाठी सध्या गाजत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात कोट्यवधी रुपयांचा नवा कार घोटाळा समोर आला आहे.

यदु जोशी , मुंबई३७५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांसाठी सध्या गाजत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात कोट्यवधी रुपयांचा नवा कार घोटाळा समोर आला आहे. कारसाठी महामंडळातून ज्यांच्या नावावर कर्ज उचलण्यात आले त्यांच्याकडे या गाड्या पोहोचल्याच नाहीत. तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्यासह त्यांच्या बगलबच्चांना या कार मिळाल्या. विशेष म्हणजे मातंग आणि तत्सम जातींसाठी असलेल्या या महामंडळातून चक्क ब्राह्मण, ठाकूर अन् मुस्लिमांना गाड्या देण्यात आल्या. या प्रकरणी महामंडळाचे मुंबईतील जिल्हा व्यवस्थापक विनोद श्यामराव वायदंडे यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. मुंबईतील मेहता सर्व्हिसेस आणि मेहता मोटर्स या दुचाकी वाहनांच्या एजन्सीला महामंडळामार्फत कर्जाऊ कार खरेदीचे कंत्राट देण्यात आले. त्यासाठी ३ कोटी ७३ लाख ६४ हजार रुपये या एजन्सीला देण्यात आले. कर्ज प्रकरणे ज्यांच्या नावावर तयार करण्यात आली त्यांना कार मिळाल्याच नाहीत. त्या भलत्यांनाच मिळाल्या.लोकमतला मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार राम महादू शिंदे राजेश दत्तात्रय गायकवाड,भारत ज्ञानदेव जाधव आणि दशरथ विनोद कसब यांच्या नावावर कर्ज दाखविले गेले आणि एजन्सीने आॅडी कार दिली ती बोरीवलीचे शब्बीर एम.मुल्लानी यांना. मुल्लानी यांच्याकडून ती गाडी एमएच ०२ डीआर ७१७१) तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्या सेवेत गेली. संजय साठे आणि नामदेव खलसे यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले पण मर्सिडिज बेंज (एमएम-२१ एव्ही ७१७१) मिळाली ती म्हसाई, ता.अंबड येथील सोपान गायके यांना. लगेच ती गाडी कदम यांच्या दिमतीला गेली आणि आताही त्यांच्याकडेच आहे. कदम अध्यक्ष असलेल्या बोरीवलीच्या जोशाबा मध्यवर्ती सहकारी संस्थेला प्रत्येकी १४ लाख ३९ हजार रुपये किमतीच्या तीन स्कॉर्पिओ गाड्या उत्तम खंडागळे, प्रवीण कारके आणि सोमनाथ खिलारे यांच्या नावे कर्ज घेऊन देण्यात आल्या. वेंकट महादू शिंदे यांच्या नावे कर्ज देऊन इन्होवा गाडी देण्यात आली ती जयेश हरेश्वर जोशी यांना. हे महाशय कदम यांनी केलेल्या गैरव्यवहारांचे सर्वात मोठे साक्षीदार मानले जातात. आरटीजीएसने ३३ लाख रुपये काढून तेजस पवार;पोखरण वर्तक नगर, ठाणे यांना तसेच गणपत गोविंद जोशी यांना प्रत्येकी एक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या. गौरव मनोहर साठे यांच्या नावावर कर्ज घेऊन महिंद्रा एक्सयूव्ही ही गाडी कौशल सिंग बोरीवली यांना देण्यात आली. रमेश कदम यांचे बंधू संतोष नागनाथ कदम यांच्या नावे कर्ज घेऊन इन्होवा गाडी त्यांनाच देण्यात आली. गणपत नरसिंग वाघमारे यांच्या नावे कर्ज घेऊन गाडी दिली ती सचिन केळकर (गोरेगाव; मुंबई) यांना. सचिन बाळू साळवे यांच्या नावे कर्ज घेऊन १९ लाख रुपयांची कार दिली ती नरहरी बोडके; गहुंजे, ता.मावळ यांना. ३८५ कोटींच्या घोटाळ्यात अद्याप कारवाई नाहीचअण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची मालिकाच लोकमतने प्रसिद्ध केली. ढळढळीत पुरावे दिले. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सीआयडीने चौकशी पूर्ण केल्याचे सांगण्यात येते. सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांनी दिलेला चौकशी अहवाल धूळ खात पडला आहे. मंत्रालयात कारवाई अडविली जात आहे.या गाड्या अशा आल्याआ. रमेश कदम यांच्याकडे सध्या असलेली आॅडी आणि मर्सिडिज बेंज या महागड्या गाड्या महामंडळाच्या पैशांतून आल्याचे या घोटाळ्याने उघड झाले आहे. या व इतर सर्व गाड्या कोणाच्या नावावर घेण्यात आल्या याची माहिती ‘लोकमत’ने आरटीओमधून मिळविली.