शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

सराफा बाजाराला नवी झळाळी

By admin | Updated: April 22, 2015 04:17 IST

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लयलूट करण्यासाठी मंगळवारी सराफा दुकानांत एकच झुंबड उडाली होती. सोन्याच्या भावात

चेतन ननावरे, मुंबईअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लयलूट करण्यासाठी मंगळवारी सराफा दुकानांत एकच झुंबड उडाली होती. सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीचा फायदा घेत देशात खरेदीदारांनी ३० टन सोन्याची लयलूट केल्याची माहिती ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली.जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ मुंबईतील सराफा बाजार सायंकाळपर्यंत ३०० कोटींच्या घरात गेला होता. त्यात सोने, चांदीसह हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश होता. दिवसभर खरेदीदारांनी दुकानांत गर्दी केली होती. दिवसभराचा मुहूर्त आणि कडक ऊन असतानाही सोने खरेदीसाठी दुपारच्या वेळीही ग्राहकांनी रीघ लावली होती. सायंकाळनंतर तर दागिने खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला.याउलट गृह खरेदीकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आनंद गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता म्हणाले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रशासकीय धोरणांचा फटका मुंबईतील विकासकांना बसला. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केडीएमसीमधील घरखरेदीला चाप लागला. त्याचा फायदा नवी मुंबईतील विकासकांना झाला. कारण मुंबई आणि केडीएमसीमधील घरांना पर्याय म्हणून बहुतांश ग्राहकांनी नवी मुंबईत गृहखरेदी करण्यास पसंती दर्शवली. नेहमीच्या मानाने आजच्या दिवशी झालेल्या गृह खरेदीच्या आकड्यात वाढ झाली असली, तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती समाधानकारक नसल्याची खंत गुप्ता यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)