शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नव्या युगाच्या महिला करणार परिवर्तनावर विचारमंथन

By admin | Updated: November 16, 2015 01:53 IST

कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने राष्ट्रीय पातळीवर सुरू केलेल्या उपक्रमाला एइसीसीच्या

पुणे : कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने राष्ट्रीय पातळीवर सुरू केलेल्या उपक्रमाला एइसीसीच्या सहकार्याने आयोजिण्यात आलेल्या ‘लोकमत वुमेन समिट’ या चळवळीचे पाचवे पर्व रविवारी (दि. २२) पुण्यात हॉटेल हयात रिजेन्सी येथे होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे, तसेच महिला सक्षमीकरणाबाबत विविध विषयांवर विचारमंथनही केले जाणार आहे.या वेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी, लेखक चेतन भगत, महिला व बालकल्याणमंत्री व ग्रामीण विकासमंत्री, महाराष्ट्र राज्य पंकजा मुंडे-पालवे, यूएसके फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा उषा काकडे उपस्थित राहणार आहेत. महिला सक्षमीकरणाची चळवळ बळकट करतानाच महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज देशभरातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने ‘लोकमत वुमेन समिट’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. संपूर्ण देशांतील विविध क्षेत्रांतील महिलांकडून या चळवळीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गेली चार वर्षे सातत्याने विविध राष्ट्रीय पातळीवरील महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला या समिटमध्ये सहभागी झाल्या आहेत. याच यशोगाथेचा पुढचा टप्पा म्हणजे परिषेदचे पाचवे पर्व आयोजिण्यात आले आहे. या परिषदेमध्ये यामध्ये मानबी बंडोपाध्याय (लिंगबदल केलेल्या कोलकाता येथील पहिल्या प्राचार्या), छवी राजावत (एमबीए झालेल्या भारतातील पहिल्या महिला सरपंच), निर्मला कंदलगावकर (अध्यक्षा, विवम अ‍ॅग्रोटेक), प्रिया नाईक (संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका, समिता सोशल व्हेंचर) जेसी पॉल (व्यवस्थापकीय संचालिका, पॉल रायटर), शैली चोप्रा (माजी वरिष्ठ संपादिका ईटी नाऊ), रिचा अनिरुद्ध (प्रख्यात निवेदिका), डॉ. ऋची दास (मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालिका हेल्थ कर्सर) तसेच शिरोज या आग्रा येथील संस्थेच्या प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सीएनएन आयबीएन, आयबीएन लोकमत तसेच आयबीएन - ७ हे टेलिव्हिजन पार्टनर आहेत. सहयोगी प्रायोजक एनईसीसी आहे. हाऊसिंग पार्टनर अजमेरा हौसींग कॉर्पोरेशन आहेत. (प्रतिनिधी)