शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

नवीन प्रशासकीय भवन निर्माण होणार

By admin | Updated: September 1, 2015 01:06 IST

सध्या पालिकेच्या मुख्यालयातील मर्यादित जागेमुळे दैनंदिन कारभारात अडचण निर्माण होत असल्याने वाढलेल्या कारभाराच्या निपटाऱ्यासाठी प्रशासन लवकरच

राजू काळे, भार्इंदरसध्या पालिकेच्या मुख्यालयातील मर्यादित जागेमुळे दैनंदिन कारभारात अडचण निर्माण होत असल्याने वाढलेल्या कारभाराच्या निपटाऱ्यासाठी प्रशासन लवकरच नवीन प्रशासकीय भवनाची निर्मिती करणार आहे.पालिकेची २०१२ मधील सार्वत्रिक निवडणूक पॅनल पद्धतीवर लढली गेली. या पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक निवडून आल्याने ४७ प्रभागांत नगरसेवकांची संख्या ९५ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या ४ प्रभाग समित्यांच्या संख्या ६ वर आणली आहे. वाढत्या लोकवस्त्यांमुळे पालिकेच्या दैनंदिन कारभारावर ताण पडत आहे. शहरात नवनवीन प्रकल्प राबविण्यात येत असून नवीन शासकीय गृहसंकुलांचीदेखील भर पडत आहे. तसेच मुख्यालयातील विविध विभागांच्या जागा अपुऱ्या पडू लागल्या असल्या तरी मुख्यालयाचे विस्तारीकरण प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. कारण, मुख्यालयाची जागा सीआरझेडबाधित असून तिचा विस्तार पर्यावरण विभागाच्या परवानगीनुसार करता येणार नाही. त्यामुळे मुख्यालयाच्या विस्तारीकरणाखेरीज नवीन प्रशासकीय भवनच निर्माण केल्यास पालिकेच्या दैनंदिन कारभाराला पुरेशी व प्रशस्त जागा उपलब्ध होण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याबाबत, नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी सांगितले की, प्रशासन नवीन प्रशासकीय भवन निर्माण करणारच आहे. परंतु, सध्या ही बाब प्राथमिक स्तरावर असून त्याला लवकरच मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे.