शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी जमीनप्रश्नी लवकरच तोडगा काढणार

By admin | Updated: April 27, 2016 03:51 IST

नेवाळी येथील जमिनीचा वाद प्रदीर्घ काळ रेंगाळला असून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही आणि नौदलाचेही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने सन्माननीय तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

ठाणे/कल्याण : नेवाळी येथील जमिनीचा वाद प्रदीर्घ काळ रेंगाळला असून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही आणि नौदलाचेही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने सन्माननीय तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री यांच्यासह संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल,अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिली.नेवाळी परिसरातील सुमारे १६०० एकर जमिनीवर स्थानिक ग्रामस्थ आणि नौदल असे दोघेही हक्क सांगत असून नौदलाने येथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम काही ठिकाणी सुरू केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता वाढली आहे. याबाबत शेतकऱ्यांनीआपल्या व्यथा पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यानुसारच मंगळवारी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, महसूल विभागाचे अधिकारी, नौदलाचे अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलवून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी नौदलाला सध्या सुरू असलेले काम थांबवण्याची सूचना केली. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसह संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन यातून सन्माननीय तोडगा काढू, असे सांगितले. (प्रतिनिधी)>दोन्ही बाजूंनी संयम बाळगावे असे आवाहन जवान आणि किसान हे दोघेही देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणावरही अन्याय होता कामा नये. म्हणूनच या प्रश्नी मध्यममार्ग काढण्याची गरज असून चर्चेनेच हा प्रश्न सुटू शकेल. मात्र, जोरजबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संयम बाळगावा,असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.