शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा आज मेळावा

By admin | Updated: May 18, 2016 00:49 IST

केंद्र शासनावर दबाव गट निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे बुधवारी नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला

पुणे : नीटचे (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) अचानक आलेले संकट दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनावर दबाव गट निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे बुधवारी नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द करून पुन्हा नीट परीक्षा द्यावी, असे आदेश दिल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण आहे. विद्यार्थी व पालकांमधील उद्रेकाला वाट करून देण्यासाठी आणि अन्यायाल वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात हा मेळावा होईल. यंदा विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करून केवळ सीईटी परीक्षेच्या गुणांच्या आधारेच मेडिकलचे प्रवेश द्यावेत, अशी भूमिका लोकमतच्या व्यासपीठावरून राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची सह्यांची मोहीम राबवून त्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले जाणार आहे. तसेच, नीटच्या प्रश्नाला कसे सामोरे जायचे, या विषयावर विद्यार्थ्यांना पुण्यातील शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. लोकमतने सर्वप्रथम नीट प्रश्नाला वाचा फोडली. नीटबाबत अध्यादेश काढून राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देता येऊ शकतो. तसेच, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत लक्ष घालून केंद्राकडे पाठपुरावा करावा. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे हे या मेळाव्याचे निमंत्रक आहेत. तसेच, डिस्ट्रिक्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन परफॉर्मन्स इनहान्समेंट अ‍ॅण्ड रिसर्चचे (डिपर) संस्थापक-सचिव हरीश बुटले, दि आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दुर्गेश मंगेशकर यांच्या सहकार्याने हा मेळावा घेतला जात आहे. पुण्यातील लोकप्रतिनिधींसह शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींना मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे.केंद्र शासनाने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून यंदा मेडिकलचे प्रवेश सीईटीनुसार देण्याबाबत अध्यादेश काढणे आवश्यक आहे. मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणे, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे राज्य शासनाने व राज्यातील खासदारांनी केंद्रावर या संदर्भात दबाव आणण्याची गरज आहे. नीट परीक्षेला कोणाचाही विरोध नाही; परंतु विद्यार्थ्यांना अचानक परीक्षा देण्यास सांगणे सयुक्तिक नाही. त्यामुळे यंदा नीट परीक्षा रद्द करावी, अशी भूमिका मेळाव्यात मांडली जाणार आहे. पालकांच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून केला जाईल. तसेच, नीट परीक्षा रद्द करण्यात सरकार अयपशी ठरले, तर विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांत कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, परीक्षेसाठी कोणत्या साहित्याचा वापर करावा, कोणत्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. (प्रतिनिधी)>नीटग्रस्त विद्यार्थ्यांना ‘लोकमत’ने दिला आवाजसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अचानक नीट परीक्षेचे संकट विद्यार्थ्यांवर आल्यावर सर्वांत प्रथम ‘लोकमत’ने या संदर्भात आवाज उठविला. शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांची चर्चा घडवून आणली. केंद्र शासनाकडून अध्यादेश हा एकमेव उपाय असल्याचे सुचविले. त्यातूनच अध्यादेशाचा पर्याय वापरण्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर नीट परीक्षेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायालाही आकडेवारीसह वाचा फोडण्यात आली.