शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर सुविधांचे जाळे

By admin | Updated: January 15, 2015 05:12 IST

राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शहरांप्रमाणेच सुविधा देण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे.

यदु जोशी, मुंबईराज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शहरांप्रमाणेच सुविधा देण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. मैलोगणती सुनसान वाटणा-या या महामार्गांवर आता विविध सुविधांचे मोठे जाळे विणले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील नगरविकास विभागाने या संबंधीचा निर्णय अलिकडेच घेतल्याने महामार्गांवर एकात्मिक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या उभारणीसाठी ०.५ इतका चटई निर्देशांक (एफएसआय) देण्यात आला आहे. एकात्मिक सुविधांतर्गत पेट्रोल पंप, विक्री व व्यवस्थापन कार्यालय, सेवा व दुरुस्ती केंद्र, सार्वजनिक स्वच्छतागृह, मॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स, मेडिकल स्टोअर, ट्रकचालकांसाठी रेस्टरुम, मोठ्या वाहनांसाठी पार्किंग तळ, बँकेचे एटीएमची उभारणी करण्याची परवानगी असेल. अ‍ॅग्रीकल्चर झोन, ना-विकास क्षेत्रात कमीतकमी १० हजार चौरस मीटर जागेवर या सुविधा उभारता येतील. शासनाने या संबंधीची सूचना जारी केली असून एक महिन्याच्या आता त्यावर सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे हायवे म्हटले की केवळ धाबे अन् पेट्रोल पंप हे आतापर्यंतचे चित्र बदलणार आहे. सध्याचे धाबे आणि पेट्रोल पंप कायम राहणार आहेत. महामार्गांवर अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परवानगीने आता महामार्गांवरच ट्रॉमा सेंटर उभारण्यात येतील. तसेच, पोलीस चौक्यांची उभारणी केली जाणार आहे.