शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक होण्यास नेट-सेट द्यावीच लागेल

By admin | Updated: December 25, 2015 03:29 IST

प्राध्यापक व्हायचे असल्यास तर नेट-सेट द्यावीच लागेल, हे उच्च न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. १९९१ ते २००० यादरम्यान नोकरीस लागलेल्या प्राध्यापकांना नेट-सेटमधून

दीप्ती देशमुख,मुंबई प्राध्यापक व्हायचे असल्यास तर नेट-सेट द्यावीच लागेल, हे उच्च न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. १९९१ ते २००० यादरम्यान नोकरीस लागलेल्या प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. प्राध्यापक म्हणून सेवा ग्राह्य धरण्यासाठी आणि बढती व अन्य लाभ मिळवण्यासाठी हंगामी प्राध्यापकांना नेट-सेट उत्तीर्ण व्हावेच लागेल, असा निकाल बुधवारी उच्च न्यायालयाने दिला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने २७ जून २०१३ रोजी शासन निर्णय काढून प्राध्यापकांनी नेट-सेट उत्तीर्ण करणे बंधनकारक केले.सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र फेडरेशन आॅफ कॉलेज टीचर आॅर्गनायझेशन (एमफुक्टो) व अन्य काही संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. १९९१ ते २००० दरम्यान नियुक्त करण्यात आलेल्या प्राध्यापकांना या अटीमधून वगळण्यात यावे. त्यांची सेवा ग्राह्य धरून बढती व अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे केली होती. तर या याचिकांना विरोध करणाऱ्या याचिका नेट-सेट उत्तीर्ण केलेल्या प्राध्यापकांच्या संघटनेने दाखल केल्या. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता मंच, इंडियन नेट-सेट असोसिएशन, प्रहार विद्यार्थी संघटना व अन्य संघटनांचा समावेश आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अनुप मोहता व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.नियमानुसार प्राध्यापकांनी नेट-सेट उत्तीर्ण होणे बंधनकाकर आहे. त्यामुळे आधीच सेवेत असलेल्या प्राध्यापकांनीही नेट-सेट उत्तीर्ण व्हावे. ज्या दिवशी ते नेट-सेट उत्तीर्ण होतील, त्या दिवसापासून त्यांची सेवा ग्राह्य धरावी. तसेच त्यांना बढती व अन्य लाभ देण्यात यावेत, असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकाचा निर्णय योग्य ठरवला.राज्य सरकारने पूर्वी नेमणूक झालेल्या प्राध्यापकांना नेट-सेट उत्तीर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली होती. २०११मध्ये ही मुदत संपली, तरीही राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही. सुमारे १० हजार प्राध्यापकांनी नेट- सेट उत्तीर्ण केलेल्या प्राध्यापकांची जागा अडवली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार नेट-सेट उत्तीर्ण झालेले सुमारे ३० हजार प्राध्यापक नोकरीची वाट पाहत आहेत. त्यामुळे सरकारने नेट-सेट उत्तीर्ण न झालेल्या प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारावा. त्यांना नेट-सेटमधून सूट देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी खंडपीठापुढे केला.